Night College 
जळगाव

खानदेशातील पहिले रात्रकालीन महाविद्यालय सुरू!

खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने आपल्या खानदेश परिसरात नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा



जळगाव ः खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटीने (Khandesh College Education Society) कान्ह कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले आहे. खानदेशातील हे पहिले रात्रकालीन महाविद्यालय (Night College) असणार आहे. महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी ( Bahinabai Chaudhary North Maharashtra University) संलग्नित असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश त्वरित निश्चित करावा, अशी माहिती प्राचार्य नंदकुमार भारंबे यांनी मंगळवारी (ता. ७) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व संचालक मंडळ सतत खानदेशातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन सामाजोभिमुख, विद्यार्थिकेंद्रित रोजगारभिमुख आणि कौशल्यधीष्ठीत अभ्यासक्रम राबविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने आपल्या खानदेश परिसरात नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. तो म्हणजे ‘कान्ह कला व वाणिज्य महाविद्यालय’. जे विद्यार्थी काम करतात, छोटा- मोठा व्यवसाय, नोकरी करतात, त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी दिवसा श्रम करून रात्रकालीन महाविद्यालयात नियमित वर्ग शिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी हे महाविद्यालय असेल. साधारणतः सायंकाळी नियमित वर्ग भरले जाऊन शिक्षणाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे सुलभ होईल. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी आपल्या क्षमता वाढवून स्वतःचा विकास करू शकेल.


संगीत, नाट्य शिकविले जाणार
केसीई सोसायटीने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तो या २०२१- २२ या शैक्षणिक वर्षापासून जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असतील, ते या रात्रकालीन महाविद्यालयात कला शाखेत संगीत, नाट्य, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र हे विषय आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ शकतात. हे महाविद्यालय मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात असेल. मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सं. ना. भारंबे, शिक्षणशास्त्र शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, पीजी महाविद्यालयाचे प्राचार्य झोपे, कान्ह ललित कला महाविद्यालयाचे संचालक मिलन भामरे, सुभाष तळेले व जनसंपर्क अधिकारी संदीप केदार या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT