जळगाव

काही वेळातच संपते... ऑक्‍सिजनचे सिलिंडर ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव :  कोविड रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तोकड्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. यातच काही रुग्णांना ऑक्‍सिजनच मिळत नाही, तर काहींना मिळालेले ऑक्‍सिजन सिलिंडर काही वेळातच संपत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

नक्की वाचा : अन तो कमी वयातच...सैन्य दलात बनला लेफ्टनंट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोविड) रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यूदर जिल्ह्यात असल्याची बतावणी खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. कोविड रुग्णालयात सुमारे दोनशे बेडना सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम बसविण्यात येणार होती. त्यातील 70 बेडना ती बसविण्याचे काम पूर्ण झाले. परंतु रुग्णालयातील "कोरोना'बाधितांची संख्या वाढतच असल्याने रुग्णांना कोविड रुग्णालयात ऑक्‍सिजनन मिळणे मुश्‍कील झाले आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये काही रुग्णांना वेळेवर ऑक्‍सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांच्या नातेवाइकांकडून केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन याबाबत योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे. 

काही तासांत संपते सिलिंडर 
कोविड रुग्णालयात सेंट्रल बेड ऑक्‍सिजन सिस्टिम लावण्यात आली आहे. परंतु रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांना ऑक्‍सिजन लावणे गरजेचे ठरते. परंतु कोविड रुग्णालयातील ऑक्‍सिजन सिलिंडर रुग्णास लावल्यानंतर अवघ्या काही तासांतच ते संपत असल्याचा प्रकारही कोविड रुग्णालयात उघडकीस येत आहे. 

सिलिंडरबाबत शंका व्यक्त 
गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्‍सिजन सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. पुरवठादाराकडून ऑक्‍सिजन सिलिंडर मोठ्या प्रमाणात पुरविले जात आहेत. मात्र, रुग्णसंख्येच्या तुलनेत ते अधिक लागत असल्याने याबाबत काही जणांकडून शंका उपस्थित केली जात आहे. 

नातेवाइकांनाच लावावे लागते सिलिंडर 
कोविड रुग्णालयात "पॉझिटिव्ह' आलेल्या रुग्णांना आयसोलेशन वार्डात दाखल केले जाते. डॉक्‍टर, परिचारिका व सफाई कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणालाही या वार्डात जाण्यास परवानगी नसते. परंतु जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाजवळ बसून त्यांना जेवणापासून ऑक्‍सिजन सिलिंडर लावण्यापर्यंत सर्वच कामे करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जाणे आवश्‍यक असून, नवीन "डीन'कडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT