tree plantation
tree plantation 
जळगाव

जिल्ह्यात 70 टक्के रोपे जगल्याचा दावा 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गतवर्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत 80 टक्के रोपे जगली असून, त्यांची वाढही होत असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसरंक्षक दिगंबर पगार यांनी दिली. गतवर्षी पाऊसही चांगला झाल्याने रोपांची वाढ चांगली झाली आहे. 

राज्य शासनातर्फे दरवर्षी वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. गतवर्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली गेली. यात वनविभाग 41.60 लाख, सामाजिक वनीकरण 20 लाख, ग्रामपंचायत 36.77 लाख, इतर शासकीय यंत्रणा 17.71 लाख, जलसंपदा विभाग 1 लाख 31 हजार 825, एमआयडीसी 30 हजार, शिक्षण विभाग 1 लाख 30 हजार 372, ऊर्जा विभाग 4530 व इतर सर्व विभाग मिळून जिल्ह्याला एक कोटी 17 लाख 19 हजार 486 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये 60.73 लाख, तर सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिंकांमध्ये 61.92 लाख, अशी सुमारे एक कोटी 22 लाख 65 हजार रोपांची उपलब्धता करण्यात आली होती. त्यातील 70 ते 80 टक्के रोपे जगली. वीस ते तीस टक्के रोपे काही कारणांनी जगली नाहीत. त्याजागी यंदा नवीन वृक्षारोपण केले जाणार आहे. यंदा केवळ पारोळा तालुक्‍यात वृक्षारोपण करावयाचे आहे. जळगाव व यावल वनविभागात विविध ठिकाणी, नदीकाठी, रस्त्यांच्या दुतर्फा, मोकळ्या टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT