जळगाव

जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपल्यात जमा; रक्षा खडसेंचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र 

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यात वारंवार महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला आहे का? असा संतप्त प्रश्‍न खासदार रक्षा खडसे यांनी थेट मुख्यमंत्री व राज्याच्या गृहमंत्र्यांनाच केला आहे. 

जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात मंगळवारी वीस वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन चौघांनी अत्याचार केला आणि त्यानंतर तिला विष पाजून बेशुद्धावस्थेत फेकून दिले. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

सततच्या घटना गंभीर 
गेल्या महिन्यात १४ ऑक्टोबरला भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात पाच वर्षाच्या मूकबधिर मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे एका तरुणीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांची अत्यंत निर्घृण हत्त्या करण्यात आली. असे असताना राज्य सरकार, राज्याचा गृह विभाग मात्र कोणतीही कारवाई तातडीने करायला तयार नाही. 
राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. महाराष्ट्र राज्यात स्त्रियांना निर्भयपणे जगता यायला पाहिजे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे अशी मागणी रक्षाई खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

या केल्या सूचना 
या पीडितांच्या कुटुंबियांना दिलासा तर नाही देता येणार परंतु हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून, या नराधमांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. या सर्व घटनांचा तपास पोलिसांनी नि:पक्षपातीपणे करावा. तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषीवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. आरोपपत्र एका आठवड्यात दाखल व्हावे आणि खटला दोन महिन्यात संपवण्यात यावा. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना श्रीमती खडसेंनी केल्या आहेत.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT