Close Market Close Market
जळगाव

आतातरी पूर्णवेळ दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या

Jalgaon Merchant News: संपूर्ण जिल्हा अनलॉक झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांतच पुन्हा ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटची धास्ती घेत कोरोना निर्बंध लावण्यात आले आहेत.

देविदास वाणी



जळगाव ः शहरासह जिल्ह्यात कोरोना (corona) बाधीतांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जिल्हा कोविड रुग्णालय (District covid Hospital) बंद करून त्याठिकाणी नॉन कोविडच्या रुग्णांची (नॉन कोविड) तपासणी सुरू केली आहे. यावरून कोरोना आता धोका जिल्ह्यात नाही. दुसरीकडे ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचे (Delta Plus’ variant) रुग्णही (Patient) सापडत नाही. उगाच तिसऱ्या लाटेचा ( Corona Third Wave) भिती दाखवून अर्थचक्र थांबवू नका. सर्व दुकाने पूर्ववत सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत सुरू करू द्यावी, अशा भावना व्यापाऱ्यांनी (Merchant)‘सकाळ’कडे व्यक्त केल्या आहेत.

(jalgaon marchent corona lockdown rulse relief by shopes open)

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या निर्बंधांतून संपूर्ण जिल्हा अनलॉक झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांतच पुन्हा ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटची धास्ती घेत कोरोना निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात दुकाने दुपारी चारपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. नंतर संचारबंदी यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण अगदी बोटावर मोजण्या एवढे आहेत. यामुळे दुकाने, व्यापारी संकुले पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी. अशा व्यापाऱ्यांच्या भावना आहेत.



कोरोना नियंत्रणात मग दुकाने सुरू करा
पुरुषोत्तम टावरी (वरिष्ठ उपाध्यक्ष कॅट, अखिल भारतीय ट्रेडर्स असोसिएशन : सकाळी सात ते दुपारी चार यादरम्यान व्यापार करताना अडचणी येतात. अगोदरच्या लॉकडाउनने आर्थिक नुकसान झालेले आहे. आता कोठे व्यापार पूर्ववत होण्याची चिन्ह आहेत. आता तर कोरोना संपल्यागत जमा आहे. ॲक्टिव्ह रुग्णही घटत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संपूर्णतः नियंत्रणात आहे यामुळे पुर्णवेळ दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जावी.

कमी वेळेमुळे जास्त गर्दी
युसूफभाई मकरा (उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ) ः जिल्हा प्रशासनाने आता सर्व दिवस दूकाने सुरू ठेवली तर गर्दी जमा होणार नाही. सकाळी सात ते दुपारी चार अशी बाजारपेठेची वेळ योग्य नाही. जास्त वेळ दुकाने सुरू ठेवल्याने गर्दी होत नाही. कमी वेळ दुकाने सुरू ठेवली तर ग्राहक गर्दी करतात. आगामी काळ सणांचा आहे. याबाबत विचार करून व्यापाराची वेळ बदलावी. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून व्यवहार करावेत.


तरच अर्थचक्र वाढेल
दिलीप गांधी (राज्य उपाध्यक्ष, कॅट) ः कोरोनोची बाधीतांची संख्या कमी झाल्याने जिल्हा कोविड रुग्णालय आता बंद झाले. डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकदा रुग्ण आढळले नंतर असे रुग्ण आढळले नाहीत. नवीन बाधीत रूग्णांची संख्या दहाच्या आत आहे. यामुळे आता पूर्णवेळ व्यवसाय सुरू करू देवून व्यापारी वाढीची संधी व्यापाऱ्यांना आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांपेक्षा अर्थचक्र वाढीचा विचार करून निर्णय घ्यावा.


पूर्णवेळ व्यापार हवाच
रमेश मतानी (अध्यक्ष, सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन) ः बाजारपेठा पूर्ण वेळ खुल्या केल्यातर अर्थचक्र वाढेल. कोरोना र्निबंधामुळे सर्वच व्यापारावर परिणाम झालेला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात अशा वेळेत दुकाने सुरू ठेवावीत. दुपारी दोननंतर ग्राहक खरेदीसाठी येतो. चारला दुकाने बंद करावी लागतात. तेव्हा आलेल्या ग्राहकाला परत जावे लागते. व्यापारी नेहमी प्रशासनाला सहकार्य करतात. आता प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करून सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT