corona recovery sakal
जळगाव

सव्वा महिना उपचार; ऑक्सीजन लेव्हल ७५ असताना कोरोनाबाधित महिलेचे वाचले प्राण

सव्वा महिना उपचार; ऑक्सीजन लेव्हल ७५ असताना कोरोनाबाधित महिलेचे वाचले प्राण

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : धरणगाव तालुक्यातील एक शेतकरी महिलेवर कोरोना बाधित (Coronavirus) होती. तिची ऑक्सीजन लेव्हल ७५ असल्याने तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical collage and Hospital) सुमारे सव्वा महिने यशस्वी उपचार केले. त्यानंतर ती संपूर्णतः बरी झाली. तिला नूकताच डिस्चार्ज देण्यात आला. जीवनमृत्युच्या (Fight with coronavirus) या संघर्षात वैद्यकीय पथकाला महिलेचा जीव वाचवण्यामध्ये यश मिळाले. (jalgaon-medical-collage-one-month-treatment-corona-positive-women-recover-and-descharge)

धरणगाव तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकरी महिलेला कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिला १६ एप्रिलला खासगी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिची ऑक्सिजन पातळी ७५ होती. ऑक्सिजन सारखा कमी जास्त होत असल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली होती.

नऊ दिवसात काढल धोक्‍याबाहेर

अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर तिला ९ दिवसानंतर धोक्यातून बाहेर काढत अतिदक्षता विभागातून कक्ष क्रमांक ९ मध्ये हलविण्यात आले. पुढील १ महिना १० दिवस कक्षामध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. गेल्या ४ दिवसांपासून तिची ऑक्सिजन पातळी नियंत्रणात आली.

महिलेला डिस्‍चार्ज

अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. शालमी खानापूरकर, डॉ. आस्था गणेरीवाल यांच्या सह कक्षातील रुपाली जोशी, प्रतिभा खंडारे, ललित सोनवणे, माधुरी टोकरे, सपना ढोले आदींनी यशस्वी उपचार केले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी आज महिलेला पुष्पगुच्छ देत रुग्णालयातून निरोप दिला. य वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मालकर, डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT