Jalgaon Drown rescued youth Jalgaon Drown rescued youth
जळगाव

मासे पकडायला गेला आणि जाळ्यात फसला;दैव बलवत्तर म्हणून वाचला!

Jalgaon Mehrun Lake News : समाधानकार होत असलेल्या पावसाने मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत सद्या वाढ झाली आहे.

भूषण श्रीखंडे

जळगावः जळगाव येथील मेहरुण तलावात ( Jalgaon Mehrun Lake) शुक्रवारी रात्री एक तरुण मासे पकडण्यासाठी गेला. परंतू मासे (Fish) पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात त्याचे दोघी पाय अडकले आणि तो पाण्यात पडून बुडू (Drown) लागला. सोबतचा मित्र त्याला वाचविण्याचे खूप प्रयत्न करत होता. पण हे प्रयत्न अपूर्ण पडत होते. ही घटना तलावाच्या बाजूलाच राहणारे नागरिकांना दिसली आणि त्यांनी घरातील लाईफ जॅकेट (Life jacket) व दोर आणून या तरुणाचा जीव वाचवीण्यात नागरिकांना यश आले.

(jalgaon mehrun lake drowning youth citizens rescued)

जळगाव शहराचे सौदर्यं म्हणून मेहरुण तलावाची ओळख आहे. काही दिवसापासून समाधानकार होत असलेल्या पावसाने तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परंतू तलावाच्या सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्न विविध घटानांतून निर्माण झाले आहे. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचे तसेच तरुणांचा मृत्यूंच्या घटना. तसेच आत्महत्येच्या घटनांवरून मेहरुण तलावाच्या काठावरील सुरक्षा व परिसराची सुरक्षेचा प्रश्न अनेकदा उपस्थित झाले आहे.

मासे पकडायला गेला अन..

तलावाच्या शेजारी असलेल्या शाळेजवळ नविन बांधकाम सुरू असून तेथील मजूरी काम कारणारे व तेथेच राहणाऱ्या तरुणापैकी दोन तरुण शुक्रवारी रात्री ९ वाजता मेहरुण तलावात मासे पकडायला आले. मासे पकडण्यासाठी दोन तरुण पैकी एक तरुण पन्नास फुट पाण्यात उतरला. परंतू तलावात आधीच मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात या तरुणाचे दोघे पाय अडकून पडला. त्याचे सोबत आसलेले मित्र जिवाच्या अंकाताने त्याला अर्धातापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत होते परंतु पाणी खोल असल्याने त्याला वाचविणे कठीण होते.

नागरिकांची धाव..

तलावाच्या परीसरातच राहणारे महेश वंजारी हे तलावाकाठी फिरत होते. ही घटना त्यांना दिसताच त्यांनी तलावाच्या शेजारी राहणारे आनंदराव मराठे यांना सांगीतली. श्री. मराठे यांनी लगेच घरुन लाईफ जॅकेट व दोर आणून या तरुणाचा जीव वाचविण्याचे प्रयत्न लोकेश मराठे, दगडू ढवळे, सतिश मोरे आदी नागरिकांनी सुरू केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता तेथे पोलीस कर्मचारी देखील आले होते. बुडत असलेल्या तरुणाला वाचविण्यासाठी जवळपास वीस मिनीटे लागली. अजून काही मिनीट उशीरा झाला असतात तर या तरुणाचा बुडून मृत्यू झाला असता. पण दैव बलवत्तर व नागरिकांची सर्तकर्ते मुळे या तरुणाचा जीव वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT