जळगाव: जळगाव शहरातील वाघनगर भागातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी नागरीक वारंवार तक्रारी करीत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठकीत सांगितले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता बी. जे. पाटील यांनी पाईपलाईनचे फक्त ५०० मीटरचे काम बाकी असून सप्टेंबर अखेरपर्यत वाघनगराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा सुरु होईल अशी माहिती दिली.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा घेण्यासाठी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जळगाव पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता बी. जे. पाटील, ए. बी. किंरगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, विविध गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.
स्वच्छ पाणी पुरवठा करा - पालकमंत्री
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यातच पावसाळाही सुरु झाला आहे. पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी नागरीकांना स्वच्छ पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता घ्यावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत अधिकाऱयांना दिले.
219 कामांचा घेतला आढावा
पालकमंत्री पाणी पुरवठा बाबत विविध कामांचा आाढावा घेतला. यात पाळधी खुर्द व बुद्रक या गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनचे सर्व्हेक्षणाचे कामाती माहिती घेत अंदाजपत्रक तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. आव्हाने गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी परीसरासाठी स्वतंत्र योजना तयार करता येवू शकते का याचा अंदाज घेण्याचा सुचना दिल्या. तसेच विदगाव, मन्यारखेडा, आसोदा शिरसोली येथील पाण्याची टाकीचे तसेच नशीराबाद येथील पाणीपुरवठ्याची तपासणी च्या सुचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. तसेच पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम तसेच सन 2018-19 व 19-20 मध्ये कार्यारंभ आदेश दिलेल्या 219 कामांचा तालुकानिहाय व योजनानिहाय आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.