Sant Muktabai Temple 
जळगाव

आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर आजपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले

मुक्ताबाई मंदिराचे देवास्थानाचे प्रवेशद्वार सकाळी अध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या हस्ते खुले करण्यात आले.

भूषण श्रीखंडे

जळगाव : कोरोना वैश्विक महामारीने (Corona epidemic) गेले १७ महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले संत मुक्ताबाई मंदिर (Sant Muktabai Temple) मुक्ताईनगर मंदिर आज पहाटे ७ वा. शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार योगायोगाने संत मुक्ताबाई जयंती दिनी नवरात्रौत्सव घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

गेल्या दोन वर्षापासून दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांना प्रदिर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष गाभार्यात जावून मुक्ताबाईचे पदस्पर्श करून दर्शन घेता आल्याने आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यामुळे मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

सकाळी अभिषेकाने सुरवात

आज पहाटे आदिशक्ती मुक्ताबाईस मानाची अभिषेक पुजा आरती संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केली. ह्यावेळी पुजारी रविंद्र हरणे महाराज, विनायक व्यवहारे, व्यवस्थापक उद्धव जुनारे, वारकरी सेवा संस्थेचे पुरूषोत्तम वंजारी, निवृत्ती पाटील, कोळी सर‌, गणेश अढाव व असंख्य भाविक उपस्थित होते.

प्रवेशद्वार उघडून भाविकांसाठी खुले

मुक्ताबाई मंदिराचे देवास्थानाचे प्रवेशद्वार सकाळी अध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या हस्ते खुले करण्यात आले. त्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून भक्तांना प्रवेश दिला जात होता.

कोरोना महामारीमूळे बंद असलेले धार्मिक स्थळाचे घटनस्थापनेला खुले करण्याचा शासनाच्या निर्णयानूसार मंदिर खुले करण्यात आले. संत ज्ञानदेवांनी आत्मसात केलेले एकांतवासाचा आदीशक्ती मुक्ताईने त्यांना बाहेर काढले होते. आणि जगाचे कल्याणासाठी करण्यात आले. आता हे औलोकिक लाॅकडाऊन मुक्ताबाईच्या जयंतीच्या पर्वावर खुले झाले आहे.

पुजारी- रविंद्र हरणे महाराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT