Corporator
Corporator 
जळगाव

जळगावात राजकीय भूकंपःभाजपाचे १० बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

भूषण श्रीखंडे

जळगावः जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) आज सकाळ पासून राजकीय घडामोडी घडत असून महासभेत भाजपच्या सदस्यांनी जोरदार हल्ला करत शिवसेनेचा स्विकृत नगरसेवक (Corporator) सदस्य निवड थांबवून महासभा शिवसेनेला (Shiv Sena) तहकुब करावी लागली. आणि काही वेळातच भाजपचे (BJP) बंडखोर १० नगसेवकांनी जी. एम. फाउंडेशन कार्यालयात आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेला आज दुसरा धक्का देत महापालिकेत आता भाजपने आपली संख्याबळ वाढवील्याने शिवसेनेचे टेश्नन वाढविले आहे.

जळगाव महापालिकेत पून्हा राजकीय घडमोडी आज प्रचंड वेगना घडल्या. यात सकाळी महासभे दरम्यान भाजपच्या सदस्यांनी जोरदार बॅटींग केल्याने शिवसेनेला महासभा तहकुब करण्याची वेळ आणावी लागली. काही क्षण उलटत नाही तोच भाजपचे बंडखोर १२ नगरसेवकांनी आमदार गिरीश महाजन यांचे जी. एम. फाउंडेशन कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी आमदार भोळेंनी पून्हा भाजपात नगरसेवक आल्याचे स्वागत केले. यावेळी महानगाराध्यक्ष अॅड. सुर्यवंशी, डाॅ. राधेश्याम चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीचे संख्याबळ वाढले

भारतीय जनता पार्टीचे २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला होता. काही महिने उलटत नाही तोच दोन-तीन दिवसापूर्वी ३ बंडखोर नगसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. आज पून्हा १० बंडखोर नगरसेवकांनी घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. अजून बंडखोर नगरसेवक पून्हा भाजपात येणार असल्याने भाजपचे संख्याबळ आता ४३ झाले आहे. त्यामुळे आधीच गटनेता, उपगटनेता पदाच्या खुचर्वीरून भाजप, शिवसेनात रस्सीखेच सुरू असतांना भाजपचे संख्याबळ वाढल्याने पून्हा नवीन राजकीय समिकरणे जुळल्याने महापौर, उपमहापौर पदासाठी चुरूस जळगाव महापालिकेत पाहायला मिळणार आहे.

यांची झाली घरवापसी..

मिनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, रजंना सपकाळे, दत्तू कोळी, प्रविण कोल्हे, शोभा बारी, पार्वताबाई भिल, रुखसाना बबलू खान, प्रिया जोहरे आदी नगरसेवकांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT