jalgaon shop
jalgaon shop jalgaon shop
जळगाव

गाळेधारकांची आग्रही मागणी; आम्हाला न्याय देणारा निर्णय घ्या !

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : महापालिकेची (Jalgaon Municipal Corporation) बुधवारी (ता. १२) महासभा होणार असून मुदत संपलेल्या गाळ्यांचा (Shop) विषय चर्चेत येणार असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी (Corporator) त्यावर अव्यावसायिक व अविकसित मार्केटमधील गाळेधारकांना न्याय देण्यासंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी गाळेधारक संघटनेने (municipal market association) केली आहे.

( jalgaon municipal market association decision justice demands)

जळगाव शहर महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेची ऑनलाइन बैठक सोमवारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेत झाली. माजी नगराध्यक्ष बंडू काळे, राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसीम काझी, हेमंत परदेशी, रिजवान जहाँगीरदार, रमेश तलरेजा, राजेश समदाणी, संजय अमृतकर व संघटनेचे इतर पदाधिकारी यात सहभागी झाले.

कुटुंब होताय उद्‌ध्वस्त
जळगाव शहरातील १६ अव्यावसायिक, अविकसित संकुलांमधील एक हजार ५०० गाळेधारकांनी गेल्या ४५ दिवसांपासून (२६ मार्चपासून) बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे गाळेधारकांचे कुटुंब उद्‌ध्वस्त होत आहे. त्यावर गाळेधारकांनी आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागाणी शासनाकडे केली होती. त्यावर बैठकीत चर्चा झाली.

लॉकडाउनचा फटका
गेल्या वर्षभरापासून सर्व व्यापारी कोरोनासारख्या महामारीला तोंड देत आहेत. मागील वर्षी लॉकडाउनमुळे १२० दिवस जळगाव शहरातील व्यवसाय, धंदे बंद होते व आताही तशीच स्थिती उद्‌भवलेली असताना मनपा प्रशासनाची मनमानी भूमिका बदललेली नाही.

...तर आत्महत्येची वेळ!
बुधवारी, १२ मेस होणाऱ्या महासभेत गाळे लिलावाचा प्रस्ताव आणला जात आहे. हा ठराव जर पारित झाला, तर गाळेधारकांनासुद्धा आत्महत्या कराव्या लागतील. तेव्हा ही जबाबदारी शासन, प्रशासन की सभागृह घेणार, असा प्रश्‍न बैठकीत उपस्थित करण्यात आला.

गाळेधारकांना हवा न्याय
गाळेधारकांचा प्रश्न हा सामाजिक दृष्टिकोनातून सोडविला गेला पाहिजे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी १२ मेच्या महासभेत १६ अव्यावसायिक, अविकसित मार्केटच्या गाळेधारकांबाबत योग्य व न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीतून करण्यात आली.

( jalgaon municipal market association decision justice demands)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT