Jalgaon Municipal Corporation)
Jalgaon Municipal Corporation) Jalgaon Municipal Corporation)
जळगाव

मनपा कर्जमुक्तीची घोषणा केवळ फसवी

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : महापालिकेत भारतीय जनता पक्षाची (BJP)सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महापालिका (Jalgaon Municipal Corporation) कर्जमुक्तीची केलेली घोषणा केवळ फसवी असून, आजही महापालिकेकडून शासनाला दरमहा तीन कोटींची रक्कम अदा केली जाते, अशी माहिती माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली. (ncp leader eknath khadse shiv sena mayor met)

महापौर जयश्री महाजन(Mayor Jayashree Mahajan) , विरोधी पक्षनेते सुनील महाजन (Leader of the Opposition Sunil Mahajan) यांनी खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर श्री. खडसे माध्यमांशी बोलत होते. माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी आदी उपस्थित होते.

श्री. खडसे म्हणाले, की शिवाजीनगर उड्डाणपूल व मनपावरील कर्जासंदर्भात महापौरांनी चर्चा केली. आजही महापालिकेवर २५० कोटींचे कर्ज आहे. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांनी तेव्हा कर्जमुक्तीची घोषणा केली होती. मात्र, हुडकोकडून घेतलेले निम्मेच कर्जमाफ झाले. उर्वरित कर्जाचे हप्ते सुरूच आहेत.


आणखी नगरसेवक संपर्कात
भाजपतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांपैकी काही पुन्हा भाजपत जाण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, सुनील महाजन म्हणाले, की असे काहीच नाही. उलट भाजपत राहिलेल्या नगरसेवकांपैकी आणखी आठ-दहा जण श्री. खडसे, गुलाबराव पाटील यांच्यासह आपल्या संपर्कात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT