lightning struck 
जळगाव

न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू

व्यक्तीने ओरडा-ओरड केल्याने परीसरातील शेतकरी व मजूर जमा झाले.

सकाळ वृत्तसेवा



न्हावी ः येथे आज दुपारी दिड वाजता जोरदार वारा व वीजांच्या जोरदार पावसाने हजेरी लावली त्यात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने (lightning struck) जागीच मृत्यू (Death) झाला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. हमीद रूबाब तडवी 47 असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीद तडवी हे न्हावी शिवारातील जानोरी जंगलात खारबर्डी धरणाच्या पाटचारीजवळ शुक्रवारी गुरे चराईसाठी गेल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहान लागल्याने पाटचारीत पाणी पीत असतांना त्यांच्या पायाजवळ वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या व्यक्तीने ओरडा-ओरड केल्याने परीसरातील शेतकरी व मजूर जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

याप्रकरणी फैजपूर पोलीस हबीब तडवी यांच्या खबरीनुसार ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राजेश बऱ्हाटे, श्रीकांत इंगळे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परीवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT