जळगाव

जळगावात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पाचशेच्या आत 

सचिन जोशी

जळगाव : दिवसेंदिवस घटत असलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता पाचशेच्या आत आली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ५३ हजारांवर गेली असली तरी प्रत्यक्षात सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्णांचा आकडा केवळ ४८० राहिला आहे. दरम्यान, बुधवारी प्राप्त अहवालात नवे ३८ रुग्ण आढळून आले, तर ८४ रुग्ण बरे झाले. 

जळगाव जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. रोजचे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक ही मालिका आजही कायम आहे. जिल्ह्यात बुधवारी ३८ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण संख्या ५३ हजार ६६७ झाली, तर ८४ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांचा आकडाही ५१ हजार ९१४ वर पोचला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट तब्बल ९६.७३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यात आजमितीस केवळ ४८० रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यापैकी ३०५ लक्षणे नसलेले तर केवळ १७५ रुग्णांना लक्षणे जाणवत आहेत. पैकी ७७ ऑक्सिजनवर असून, केवळ २५ रुग्णच ‘आयसीयू’त आहेत. गेल्या २४ तासांत जळगाव तालुक्यातील ६६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 


असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १२, भुसावळ ४, चोपडा ३, पाचोरा १, यावल १, एरंडोल २, जामनेर ७, पारोळा १, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर १, अन्य जिल्ह्यातील १. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT