st bus transport
st bus transport 
जळगाव

"एसटी' निघाली रंग अन्‌ प्लॅस्टिक घेऊन! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाची "लालपरी' अर्थात "एसटी' ही ग्रामीण भागाची "जीवनवाहिनी' ठरली आहे. नेहमी प्रवाशांना घेऊन धावणारी "एसटी' आता मालवाहतुकीसाठी सज्ज झाली आहे. यात जळगाव विभागातून पहिली मालवाहतूक करणारी बस यवतमाळला रंग आणि प्लॅस्टिक घेऊन धावली. 

"कोरोना व्हायरस'मुळे "लॉकडाउन' सुरू आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक करणारी व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव विभागातूनदेखील बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दिवसभरातून होणाऱ्या बसफेऱ्यांमधून मोजकेच प्रवासी मिळत असल्याने उत्पन्नापेक्षा तोटाच अधिक सहन करावा लागत होता. यामुळे "एसटी'तून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव विभागात आजपासून मालवाहतुकीचा प्रारंभ करण्यात आला. जळगाव विभागातून जाणाऱ्या पहिल्या ट्रकचे पूजन जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आगार व्यवस्थापक निलेश पाटील, विभागीय भांडार अधिकारी विशाल राखुंडे, स्थानकप्रमुख नीलिमा बागूल यांच्यासह विभागीय वाहतूक अधिकारी बंजारा, विभागीय कामगार अधिकारी राहुल शिरसाठ, जळगाव आगाराचे राजेश पाटील, संदीप सूर्यवंशी उपस्थित होते. 
 
तांदूळ घेऊन येणार परत! 
जळगाव विभागातून पहिला मालवाहतूक ट्रक रंग व इतर प्लॅस्टिकचे साहित्य घेऊन यवतमाळ येथे रवाना झाला; त्याचप्रमाणे जळगाव येथूनच परतीसाठी यवतमाळहून जळगाव येथे तांदूळ आणण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. आगार व्यवस्थापक निलेश पाटील, विभागीय भांडार अधिकारी विशाल राखुंडे, स्थानकप्रमुख नीलिमा बागूल यांनी प्रत्यक्ष ट्रकमध्ये जेथून माल भरावयाचे ठिकाण गुजरात पेंटस्‌ या कंपनीत भेट देऊन गाडीत भरावयाच्या मालासंबधी संपूर्ण माहिती घेतली व कंपनी प्रशासनाला भविष्यातदेखील अशीच कामगिरी देण्याचे आवाहन केले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT