eknath khadse, chandrakant patil sakal
जळगाव

चंद्रकांत पाटील नेहमी बदलतात; खडसेंनी काढला चिमटा

चंद्रकांत पाटील नेहमी बदलतात; खडसेंनी काढला चिमटा

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) आपल्या मतावर कधीच ठाम राहत नाही. त्यांची मते ही रोज बदलत असतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ncp leader eknath khadse) यांनी चिमटा काढला आहे. (jalgaon-political-news-eknath-khadse-statment-chandrakant-patil)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन साजरा होत आहे. एकनाथ खडसे गुरुवारी सकाळी जळगावात आले असता जिल्हा पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला त्‍यांनी उपस्थिती लावली. यानंतर जळगावातील मुक्ताई निवासस्थानी त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण प्रश्‍नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल, असे वक्तव्य केले. या वक्‍तव्‍यावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढत म्हणाले, की चंद्रकांत पाटील हे आपल्‍या मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात. आजपर्यंत त्यांनी ठामपणे भूमिका घेतली नसून आता काही सांगतील, नंतर लगेच बदलतील; असा माझा अनुभव राहिला आहे. त्यांना मैत्री करायची असेल तर त्यांनी करावी, त्यांच्याकडे जावे, असे खडसेंनी सांगितले.

राष्ट्रवादी आता तारुण्यात

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजवर २२ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले आहेत. पक्षाच्या वाटचालीवर नजर टाकली; तर सर्वांनी पक्ष विस्तारासाठी परिश्रम घेतले आहेत. परंतु, अजूनही पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पक्षाची वाटचाल २२ वर्षांची झाली आहे; अर्थात पक्ष आता तारुण्यात आल्‍याचे खडसे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT