जळगाव

दुर्धर व्याधी, हिमोग्लोबिन फक्त १.५ टक्के; तरी गर्भवतीची कोरोनावर मात !

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Jalgaon Government Medical College) व रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात (Department of Gynecology and Obstetrics) केवळ दीड टक्के हिमोग्लोबिन (Hemoglobin) असलेल्या तसेच चार दुर्धर आजारांनी ग्रस्त २५ वर्षीय गर्भवतीने (Pregnant wooman) कोरोनावर मात (corona free) केली.


(pregnant wooman corona free jalgaon government medical college)

या महिलेस मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यात डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या वैद्यकीय पथकाला यश आले आहे. तिच्या पोटातील अडीच महिन्यांचा मृत गर्भदेखील काढण्यात आला आहे. बोदवड येथील एका पानटपरी चालकाची आर्थिक परिस्थिती हलाखीची...त्यातच २५ वर्षीय पत्नीला हाडांचा ठिसूळपणा, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित एसएलई, रक्तक्षय, थॅलेसेमिया अशा व्याधी जडलेल्या...या आजारांवर मुंबईत देखील उपचार सुरु असताना त्यांना शेवटी जळगावातून दिलासा मिळाला.

गर्भवती आढळली बाधित
संबंधित महिला अडीच महिन्यांची गर्भवती देखील होती. अशातच तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बोदवड ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

टीमचे प्रयत्न यशस्वी
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या टीमने उपचार सुरु केले. तपासणी केल्यावर तिचे हिमोग्लोबिन १.५ टक्के निघाले. श्‍वसनाचा वेग जास्त असल्याने धाप लागत होती. महिलेस रक्ताच्या सहा पिशव्या लावाव्या लागल्या. अतिदक्षता विभागात दाखल करून तिची स्थिती नियंत्रणात आणली. तसेच, पोटातील गर्भ अडीच महिन्याचा मृत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गर्भ सुरक्षितपणे काढला. आता महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दोन दिवस निगराणीनंतर शुक्रवारी घरी सोडण्यात आले. या वेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते सदर महिलेला साडी, गुळाची चिक्की आणि आखाजीनिमित्त आंबे भेट देत तिला निरोप देण्यात आला. प्रसंगी वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे, अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. संदीप पटेल उपस्थित होते.

(pregnant wooman corona free jalgaon government medical college)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्क की फ्लोरिडा... भारताच्या सराव सामन्याबाबत गोंधळ

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिंदेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT