Online Education
Online Education Online Education
जळगाव

पहिल्या दिवशी शिकवायचे काय ?..शाळांसमोर प्रश्‍न

देविदास वाणी


जळगाव ः कोरोना महामारीमुळे यंदाही शाळा मंगळवार (ता. १५) पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू (Online Education) होणार आहेत. अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही शाळा (School) कशा पद्धतीने सुरू कराव्यात, यासाठी काय नियम आणि मार्गदर्शक सूचना असतील, हे अद्याप शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) स्पष्ट केलेले नाही. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाचा ‘श्री गणेशा’ कसा करायचा, याचे कोडे संस्थाचालकांसह शिक्षकांना पडले आहे. (question for teachers is what to teach in online education)

नवीन शैक्षणिक वर्षातील शाळांना १५ जूनपासून सुरवात होणार आहे. मात्र विद्यार्थांना अजून शाळांमध्ये बोलविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, या वर्षाच्या अभ्यासक्रमास मंगळवारपासून ऑनलाइन पद्धतीने सुरवात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.

शाळा बंद..

नवीन वर्षाच्या शालेय नियोजनाबाबत शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी डॉ. राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. शासनाकडून शाळांमध्ये विद्यार्थांना बोलविण्याबाबत अद्याप आदेश नसल्याचेही सांगण्यात आले. मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट ओढवल्याने राज्यासह जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. एप्रिलच्या नियोजनानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुटी याबाबत शिक्षण संचालनालयाकडून निश्चिती करण्यात आली होती. यानुसार १ मेपासून उन्हाळी सुट्या लागू करण्यात आल्या. १४ जूनपर्यंत या सुट्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये १५ जूनला शाळा सुरू करण्यात याव्या. शाळांतून उन्हाळ्याची, तसेच दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्या इतर सणांसाठी देण्यात याव्या. शैक्षणिक वर्षातील सर्व सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शासकीय, तसेच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

शिक्षक, मुख्याध्यापकांना पडलेले प्रश्‍न
* नवीन वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक (अॅन्ड्रॉइड फोन असलेले) कसे शोधणार?
* विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन ग्रुप बनविण्यास किती दिवस लागणार?
* विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना लागू आहे. त्यांना पुस्तकेच मिळाली नाही, तर अभ्यासक्रम कसा शिकवणार?
* ग्रामीण भागातील प्रत्येकाकडे अॅन्ड्रॉइड मोबाईल असेलच असे नाही; त्यांना ग्रुपला कसे जॉइंन करावे?
* विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षण घेण्याची मानसिकता असेल का?
* समजा एका पालकांना दोन मुले आहे व एकच मोबाईल आहे, दोघे एकच मोबाईलवर अभ्यास कसा करणार?


आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. त्यांना अद्याप पुस्तकच दिले नसतील तर त्यांना अभ्यासक्रम कसा सांगणार? सर्वांत अगोदर पहिल्या दिवशी नवीन वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप शिक्षकांना बनवावा लागेल. अनेक विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्रॉइड मोबाईल नाही. त्यांना शिकवणार कसे?
- डॉ. मिलिंद बागूल, पर्यवेक्षक,
सार्वजनिक विद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईसाठी ऋतुराज-रहाणेकडून दमदार सुरुवात; पंजाबच्या गोलंदाजांचा विकेट्ससाठी संघर्ष

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT