Education Education
जळगाव

सेतू अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांनाच प्रश्‍न‍

शिक्षक त्यांच्याच मोबाईलवर शिकवतात, मात्र विद्यार्थ्यांच्या ते पचनी पडत नाही.

देविदास वाणी



जळगाव : सर्व विद्यार्थी मागील वर्षीपण मोबाईल नसल्याने ऑनलाइन अभ्यासक्रमात (Online teaching) सहभागी झाले नाही. क्रमिक अभ्यासक्रम व ‘सेतू अभ्यासक्रम’ सर्व शेवटी अभ्यासक्रमच आहे. जर मुले शाळेत येऊ शकत नाही, ऑनलाइनसाठी त्यांच्याकडे मोबाईल नाही, मग ‘सेतू अभ्यासक्रम’ (Education) काढून काय साध्य होईल. कारण मूळ मुद्दा ‘मुलांकडे मोबाईल (Mobile) नाही’, हा प्रश्न तसाच अतुत्तरित आहे. कारण मुलांना संपूर्ण सूचना देण्यासाठी व दररोज अभ्यास सोडवून घेण्यासाठी मुलांना ४५ दिवस रोज मार्गदर्शन करायचे आहे. त्यासाठी मुले प्रत्यक्षात समोर किंवा ऑनलाइन समोर असणे गरजेचे आहे. जर मुले समोर नसतील तर लेखी स्वरूपात किती व कसे मार्गदर्शन मिळण्याबाबत शिक्षण आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. (questions to teachers about setu curriculum)


शिक्षण विभागाच्या सूचनेनूसार १ जुलैपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेतू अभ्यासक्रम सुरू झाला आहे. यात मागील वर्षी जे शिक्षण घेतले त्याचीच उजळणी आहे. विद्यार्थी कंटाळत असल्याचे चित्र आहे. शिक्षक त्यांच्याच मोबाईलवर शिकवतात, मात्र विद्यार्थ्यांच्या ते पचनी पडत नाही. या अभ्यासक्रमांची पुस्तके नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ४५ दिवसांत हा अभ्यासक्रम कसा पूर्ण शिकवावा, असे प्रश्‍न शिक्षकांसह शिक्षण व प्रशिक्षण संस्थेलाही पडले आहेत.



शिक्षकांना पडलेले प्रश्‍न...
- अभ्यासक्रम ऑनलाइन राबवावा की ऑफलाइन हे स्पष्ट होत नाही?
- सेतू अभ्यासक्रमाची पुस्तिका शासनाकडून उपलब्ध होणार आहे का?
- ऑनलाइन शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे अशक्य? इतरांचे कसे?
- १४ ऑगस्यपर्यंत सेतू अभ्यासक्रमच घ्यायचा, की चालू इयत्तेचा अभ्याससुद्धा घ्यायचा?
- ५० टक्के शिक्षक उपस्थिती असताना ४५ दिवसांत कोर्स पूर्ण करणे शक्‍य आहे का?
- विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यांचे कसे? एकत्रीत करून? भेटून? वा शाळेत बोलावून पूर्ण करायचे?
- ग्रामीण भागात ऑनलाइन अभ्यासाला अडचणींचा डोंगर
- चालू वर्षाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके कधी उपलब्ध होणार?
- नियमित अभ्यासक्रमाला सुरवात केव्हा करायची?
- मुलांकडे मोबाईल नाही, हा मूळ मुद्दा अनुत्तरित ठेवून सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती होतेय
- शिक्षकांनी केवळ व्हॉट्सअॅपवर सेतू अभ्यासक्रमाची फक्त पीडीएफ पाठवायची का?
- विद्यार्थ्यांना प्रत्येक भाग कसा सोडवावा याची संपूर्ण सूचना व्हॉट्सॲपवर देता येणे शक्‍य आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT