reti 
जळगाव

लिलाव रखडले अन्‌ सुरू झाली रेतीवाल्‍यांची ‘लीला’...पाचपट दराने विक्री

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अद्यापही रखडलेलीच आहे. जिल्ह्यात एकीकडे बांधकामांसाठी रेतीची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे मात्र वाळू चोरीछुपे पाचपट दराने विकली जात आहे. पर्यावरण समिती वाळू लिलावाच्या प्रक्रियेत या ना त्या त्रुटी काढून वाळू लिलावांना विलंब करीत असल्याचे दिसून येते. शासकीय दराच्या पाचपट रक्कम वाळू माफीया गरजू व्यक्तींकडून वाळूसाठी घेताना दिसत आहेत. शासकीय दर प्रतीब्रास चार हजार रूपये आहे. 

जळगाव जिल्ह्यातील गिरणा, तापी नदीपात्रातील वाळूला राज्यात, राज्याबाहेरही चांगली मागणी आहे. त्यामुळे या ठिकाणचे वाळूघाट घेण्यासाठी राज्यभरातून ऑनलाइन बोली लावल्या जातात. मागील वर्षापासून मात्र वाळू लिलावप्रक्रिया प्रशासकीय धोरणांमुळे खोळंबली आहे. जिल्ह्यातील ४३ वाळू घाटांचे प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आले होते. पर्यावरण समितीची बैठका दोन वेळा ऑनलाइन झाल्या. त्यातील प्रस्तावात काही दुरुस्त्या राज्याच्या पर्यावरण समितीने सुचविल्या आहे. 

लिलावात अडचणी 
जिल्ह्यातील ४३ पैकी १८ वाळूघाट एक हेक्टरपेक्षा कमी अाहे. ते रिव्हाइज करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण समितीने दिल्या आहेत. उर्वरित २५ घाटांसंदर्भात नव्याने आराखडा तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व दुरुस्त्यांचे काम सध्या सुरू आहे. त्या झाल्यानंतर पुन्हा पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठविल जातील. हे प्रस्ताव गेल्यानंतर पर्यावरण समितीची बैठक होऊन त्यात लिलावप्रक्रियेला मंजुरी मिळेल. तोपर्यंत किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. 


या वाळूघाटांची होणार प्रक्रिया 
जळगाव : भोकर, पळसोद. 
रावेर तालुका : वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बुद्रुक, केऱ्हाळे बुद्रुक, धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी. 
यावल तालुका : थोरगव्हाण, पिंप्री. 
चोपडा : पिंप्री, घाडवेल, कोळंबा, सुटकार, धावडे, रुंधाटी- १ व २, सावखेडा, हिंगोणेसिम प्र. ज. भाग १ व २. 
धरणगाव : बांभोरी प्रचा, आव्हाणी, नारणे, बाभूळगाव १ व २. 
एरंडोल : टाकरखेडा, वैजनाथ, उत्राण अ.ह. 
पारोळा : बहादरपूर, महालपूर, उंदीरखेडे १ व २. 
भुसावळ : जोगलखेडा, भानखेडा, गोंभी, सुनसगाव, बेलव्हाय भाग १, २, ३.

संपादन : राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 पहिल्यांदाच मिळतोय इतका स्वस्त; हजारो रुपयांचा डिस्काउंट, iPhone 16 अन् MacBook वरही जबरदस्त सूट..'इथे' सुरुय ऑफर

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये भाजपला धक्का? शिवसेना-राष्ट्रवादीत ७०-५० चा फॉर्म्युला ठरला!

खाकी वर्दीला सलाम! दारुच्या नशेत पती गर्भवती पत्नीला नेत होता रुग्णालयात, पोलिसांनी अडवलं अन्... पाहा VIDEO

'आईवडील सतत भांडण करायचे' बिग बॉस फेम मालती चहरने सांगितला जुना किस्सा, म्हणाली..'मला मारायचे...'

Pune Municipal Elections: घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी केलं शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT