जळगाव

वाळूमाफियांची आता खैर नाही; पाचोरा, भडगाव तालुक्यात कलम १४४ लागू !

देविदास वाणी

जळगाव  : अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले असून, पाचोरा व भडगाव तालुक्यातील गिरणा, तितूर व गडद या तीन नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतुकीला बंदी घातली आहे. नदीपात्रातील गावांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. ही बंदी १५ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर दरम्यान राहणार आहे. 

पाचोरा व भडगाव तालुक्यातील गिरणा, तितूर व गडद नदीपात्रांतून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. महसूल विभागाच्या पथकामार्फत अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु सध्या या तिन्ही नदीपात्रात अधिकृत लिलाव झालेला नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीला अटकाव करण्यासाठी या तीनही नद्यांच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाळू वाहतूक व उत्खनन करणाऱ्या (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

प्रतिबंध घातलेली गावे अशी 
पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द, पुनगाव, माडकी, ओझर, अंतुर्ली बुद्रूक प्र.पा., भातखेडे खुर्द, परधारडे, बहुळेश्वर, दुसखेडे, कुरंगी, माहिजी, वरसाडे प्र. बो., बाळद बुद्रूक, नाचणखेडे, होळ, सांगवी बुद्रूक प्र.भ., घुसर्डी बुद्रूक प्र.भ., वडगाव खुर्द प्र.भ. व पिंप्री बुद्रूक प्र.भ. तसेच भडगाव तालुक्यातील भडगाव, सावदे, टोणगाव बांबरुड प्र. उ. गिरड, कराब, वडदे, टेकवाडे, वाडे, पिंपळगाव बुद्रूक भट्टगाव, अंतुर्ली बुद्रूक, भातखंडे बुद्रूक, नावरे, बाळद खुर्द, गिरड व कोठली या गावातील गिरणा, तितूर व गडद नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाळू वाहतूक किंवा उत्खनन करणाऱ्या (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीने आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहन तसेच या क्षेत्रात वाहनास प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने परवानगी दिलेल्या वाहनास लागू होणार नाही, असे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले. 

या कालावधीसाठी प्रतिबंध 
उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा भाग पाचोरा फौजदारी प्रक्रिया संहित १९७३ चे कलम १४४ आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार १५ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२० च्या रात्री बारापर्यंत ही कलम लागू राहणार आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसचा जल्लोष, प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी वांद्र्यात गर्दी

SCROLL FOR NEXT