जळगाव

विकेल ते पिकेल’ संकल्पनेतून आता भरीताच्या वांग्यांची विक्री 

देविदास वाणी

जळगाव ः ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून भरीत वांगी व भरीत विक्री उपक्रमाचा कृषिमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते उदघाटन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भरीत व भरीत वांगी पणन यासाठी पुढाकार घेणाऱ्या आसोदा (ता.जळगाव) येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे किशोर चौधरी, नितीन चौधरी, संजय चिरमाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे आदी उपस्थित होते. 

वांगी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री भुसे यांना भरीताची वांगी भेट म्हणून दिली. थेट भरीत विक्री कार्यक्रमाचाही शुभारंभ झाला. पुढील टप्प्यात भरीत व वांगी विक्रीचे केंद्र, ऑनलाईन विक्री याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जावे, अशी मागणी करण्यात आली. कृषिमंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी पोकरा योजनेतून पाईप, इंजिनपुरवठ्यासंबंधी अर्ज स्वीकारण्याची मागणीदेखील केली. 

‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेत शासनाने भरीताच्या वांग्यांसह दादर ज्वारीचा समावेश केला आहे. भरीताच्या दर्जेदार वांग्यांचे उत्पादन घेतले जाते. या वांग्यांची जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर चांगली मागणी असते. या वांग्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासंबंधी कृषी विभागाने त्यांचा विकेल ते पिकेल संकल्पनेत समावेश केला आहे. 

अकोला येथे विधान परिषदेच्या निवडणुकीसंबंधी प्रचाराला जाताना कृषीमंत्री भुसे हे जळगावात थांबले. त्यांनी दुपारी व्हीसीच्या माध्यमातून कॅबीनेटच्या बैठकीला उपस्थिती दिली. यानंतर शहरात भरीत वांगी विक्री केंद्राचा शुभारंभ केला. शहरातील गिरणा जलकुंभ परिसरात चर्चनजीक एक केंद्र कृषी विभागातील निवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी सुरू केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

SCROLL FOR NEXT