Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation Jalgaon Municipal Corporation
जळगाव

महापौरांच्या खडसे भेटीने शिवसेना नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह!

कैलास शिंदे

जळगाव ः राज्यात शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री(Chief Minister Uddhav Thackeray). नगरविकास खातेही शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंकडे (Minister Eknath Shinde). जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेचाच. तरीही जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे महापौर(Mayor), विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition) राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसेंकडे (NCP Leader Eknath Khadse) प्रश्‍न घेऊन जात असतील, तर शिवसेनेच्या नेतृत्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. ( shiv sena mayor visit by eknath khadse and question mark shiv sena leadership)

जळगावच्या महापौर जयश्री महाजन व त्यांचे पती तथा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी नुकतीच माजी मंत्री एकनाथ खडसेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या पार्श्वभूमीवर पुन्हा राजकीय उलटसुलट चर्चा सुरू झालीय.

सुरेशदादा गट महाजनांविरुद्ध
जळगाव महापालिकेत भाजपची व पर्यायाने गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखालील सत्ता शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक फोडून उलथावून लावली. गिरीश महाजन यांनाच ही चपराक मानली जात आहे. मात्र, गिरीश महाजन यांनी अडचणीच्या काळात जिल्ह्यातील शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना मदत केली हे सर्वश्रुत आहे. मग त्याच सुरेशदादा जैन यांचे नेतृत्व मान्य करणारे शिवसेना नगरसेवक महाजन यांच्या नेतृत्वाला आव्हान कसे देऊ शकतात? हा प्रश्न आजही जळगावकरांच्या मनात रुंजी घालतोय.

नेतेच पुढची जबाबदारी घेणार

महापालिकेच्या सत्तांतर घडामोडीत जिल्हा शिवसेनेत उलथापालथ झाली. यात थेट राज्यातील नेत्यांनी मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील नेतेच पुढची जबाबदारी घेणार असल्याची चर्चा आहे.


त्या वेळी खडसेंचे नावही नाही
सत्तांतर घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा वाटा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सत्तांतरानंतर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी तसेच स्थानिक नेत्यांनी खडसे यांचा उल्लेख केला नाही. वैयक्तिक दिलेल्या महापौर व उपमहापौर जाहिरातीत त्यांचे साधे छायाचित्रही टाकण्याचे औचित्य दाखविण्यात आले नाही. महापालिकेत आता सत्तेचा गाडा चालविताना महापौर आणि त्याच पक्षाचे विरोधी पक्षनेते यांना अडचणी दिसू लागल्या आहेत.


नगरसेवकांना सांभाळणे कठीण
आपल्या पक्षापेक्षा बाहेरून जास्त आलेल्या फुटीर नगरसेवकांना सांभाळणे तारेवरची कसरत असते याची जाणीव त्यांना झाली. शिवाय पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी मुंबई, ठाणे महापालिका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जळगावचा विषय ते किती गांभीर्याने घेत असतील हा प्रश्नच आहे. शिवसेना संपर्कप्रमुखाचे विरोधी पक्षनेते म्हणून मित्रत्व ठीक; पण आता सत्ताधारी म्हणून त्यांच्याकडून महापालिकेचे प्रश्‍न सोडवून घेणे मोठी कसरत आहे. कारण महासभेचा अजेंडा त्यांना दाखवावा लागतो, त्यातून त्यांचा हस्तक्षेप सुरू होतो आणि तोच अडचणीचा ठरतो. अशीच कोंडी महापौर आणि विरोधी पक्षनेते यांची झाली आहे.

एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न
सत्तेत यातूनही मार्ग काढण्यासाठी सुनील महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. महापौरांसह भेट घेऊन त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. खडसे यांनीही महापालिकेवर आपले नेतृत्व असून, सत्तांतर करण्यात आपलाच सहभाग होता हेसुद्धा याच भेटीतून सिद्ध करून दाखविले आहे. सत्तांतर झाल्यानंतर श्रेय घेण्यात शिवसेना नेत्यांचे छायाचित्र असले, तरी त्याचे शिल्पकार आपण आहोत, असा संदेश यातून दिला गेला.

लढ्ढा, भंगाळे भेटीपासून दूर
शिवसेनेचे महापौर व विरोधी पक्षनेत्यांनी भेटीसाठी जाताना महापालिकेचे गटनेते व सत्तांतर घडवून आणण्यात सहभाग असलेले नितीन लढ्ढा यांना सोबत का घेतले नाही? सत्तांतर होताना सर्व चर्चा लढ्ढा करीत होते. मग या भेटीत त्यांना डावलले की तेच आले नाहीत? याशिवाय महापालिकेत असलेले विष्णू भंगाळे यांना पक्षाने जिल्हाप्रमुख केले आहे. त्यांनाही सोबत का घेतले नाही, असे अनेक प्रश्न या भेटीतून पुढे आले आहेत. आपला मुख्यमंत्री, पालकमंत्री असताना, प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या दारात का जावे लागले? या प्रश्नाचे उत्तर मात्र आगामी काळात होणाऱ्या घडामोडीत दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT