जळगाव

सामान्य कुटुंबातील चौघा भावंडांचे एकच ध्येय; त्यांचा ‘मेडिकल’चा वाटेवरील प्रवास ! 

रईस शेख

जळगाव : सामान्य मुस्लिम कुटुंब... संघर्षातून शिक्षक झालेले माता-पिता... आजोळीही शैक्षणिक वातावरण... अशा कुटुंबात वाढलेल्या पिढीने उच्चशिक्षणाची वाट निवडली नसती तरच नवल! झालेही तेच. शाहूनगरातील शेख कुटुंबातील चौघा भावंडांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाची ठरवून निवड केली. पैकी दोघे डॉक्टर झालेही, अन्य दोघे डॉक्टरी शिकतायेत. या चौघांमध्ये तिघी मुली आहेत, हे उल्लेखनीय. 

आवश्य वाचा- शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय;  छापा पडला आणि सत्य समोर आले !  

शेख हारून शेख बशीर. इकरा संस्थेत शिक्षक, नंतर मुख्याध्यापकापर्यंत मजल मारताना पीएच.डी. पूर्ण केली. ज्ञानार्जन करताना वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या हारून सरांचा राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मान झाला आहे. या समाजात विशेषत: महिलांच्या उच्च शिक्षणाप्रति तेवढी जागरूकता नसताना त्यांच्या पत्नी शबाना परवीन यांनीही विद्यापीठात ऊर्दूतून एम. ए. (टॉपर) केले. 

पाल्यांची शैक्षणिक ‘परवरीश’ 
पालकांची शिक्षणाबद्दलची आस्था आणि धडपड बघतच हारून सरांची चौघेही पाल्य अनुक्रमे इरम फातेमा, तजईन फातेमा, मिदहत फातेमा आणि मुलगा मोहंमद कामरान मोठी झाली. कुटुंबातील शैक्षणिक चळवळीला या पाल्यांनी मोठे होताना वेगळा ‘आकार’ दिला. 

धरली ‘मेडिकल’ची वाट 
थोरल्या इरमने बारावीत गुणवत्ता प्राप्त करत नेरुळ (नवी मुंबई) मधील डेंटल कॉलेजमधून बीडीएस पूर्ण करताना पाठची बहीण तजईनने बारावीतील गुणांच्या आधारे नाशिकमधील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेत एमबीबीएस पूर्ण केले. तिसरी बहीण मिदहतनेही दोघा बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवले. ती नाशिकमधील डॉ. पवार महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा देतेय. तिन्ही बहिणी डॉक्टर होत असताना, कामरान मागे कसा राहील? त्याचाही नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित झाला आहे. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील चौघा भावंडंची संपूर्ण पिढीच ‘मेडिकल’च्या वाटेवरील प्रवासी झालीय. समाजातील अन्य घटकांसाठी शेख कुटुंबातील पाल्यांची ही वाटचाल प्रेरणादायी ठरेल, अशीच आहे. 

ठिगळाच्या कपड्यात शिक्षणाचा ‘मधुरस’ 
चार अपत्यांना डॉक्टर घडविणारा पिता हारून बशीर यांच्या बालपणी आईचे छत्र हरपले. वडिलांचे दुसरे लग्न, जळगावी मावशीकडे दंगलगस्त कॉलनीत झोपडीवजा घरात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मावशीचे कुटुंबच मोठे असल्याने शाळेतून घरी आल्यावर स्वयंपाकाला मदत, अंगात ठिगळाचे कपडे, पायात तुटकी स्लिपर अशा स्थितीत त्यांनी आयुष्यातील ‘गोल्स’ निश्‍चित केले अन्‌ गाठलेही. कुटुंबात त्यांनी जी शिक्षणाची पायाभरणी केली ती चुलत, मावस भावंडांना प्रेरणादायी ठरली. मावशीची सहापैकी चार मुले सरकारी नोकरीत. पुढे जाऊन समाजातील गरजू तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT