जळगाव

धरणगावात खोदकामाकरतांना आढळले दोन शिलालेख

सकाळ वृत्तसेवा



धरणगाव: येथील पालिकेच्या बांधकामावेळी खोदकामात दोन शिलालेख (Inscription) आढळून आले आहेत. अनेक दिवसांपासून ते ग्रामीण रुग्णालयाच्या (Rural Hospital) मागील बाजूला पडून होते. ग्रामीण रुग्णालय येथे सध्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (Oxygen generation project) काम सुरू आहे. या कामाचे ठेकेदार व इतिहासाचे अभ्यासक उज्ज्वल पाटील (History Practitioner) यांना हे शिलालेख निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी तत्काळ दखल घेत पुरातत्त्व विभाग (Department of Archeology), औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. औरंगाबाद विभागाने (Aurangabad) याठिकाणी भेट दिली.

(two inscriptions found during excavations in dharangaon)

औरंगाबाद पुरातत्त्व विभागाचे भुजंगराव बोबडे, राज्य कर सहाय्यक आयुक्त समाधान महाजन, इतिहासकार सुशीलकुमार आहेरराव, धरणगाव येथील नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, उज्ज्वल पाटील यांनी भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथे ब्रिटिशांची मुख्य वसाहत होती. खानदेशची राजधानीदेखील धरणगाव होती. येथे ब्रिटिशांच्या कंपन्या होत्या. याठिकाणी आढळलेल्या दोन शिलालेखांवरील एका शिलालेखावर इंग्रजी आणि दुसऱ्या शिलालेखावर मराठी या दोन्ही भाषेत माहिती विषद केली आहे.

अशी आहे माहिती
ब्रिटिश काळात लंडन येथे जन्मलेले लेफ्टनंट सर जेम्स औक्ट्रम हे ब्रिटिशांचे सेनापती होते. त्यांचा उल्लेख यावर दिसून येतो. लेफ्टनंट औक्ट्रम यांनी धरणगाव येथे भिल्ल बांधवांच्या तुकड्यांची स्थापना केली. सध्याचे ग्रामीण रुग्णालय हे तेव्हा जिल्हा कार्यालय होते. १८२५ ते १८३५ या दहा वर्षांच्या कालावधीत औकट्रम हे धरणगाव येथे राहायचे. धरणगाव येथील कार्यामुळे त्यांना संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली. ‘बेयर्ड एक निष्कलंक आणि निर्दोष सरदार’ ही एक मोठी मानली जाणारी पदवी आहे. ही पदवी या औक्ट्रम यांना मिळाली होती. या पदवीचा उल्लेख या शिलालेखावर करण्यात आला आहे.


लेफ्टनंट औक्ट्रम या याठिकाणी असताना साधे लेफ्टनंट म्हणून ते कार्यरत होते. जे नंतर ब्रिटिशांचे लेफ्टनंट जनरल, ब्रिटिशांचे सेनापती म्हणून कार्यरत झालेत. औक्ट्रमच्या नावाने घाटदेखील आहे. त्यांचा कोलकता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथेही भव्य पुतळा आहे. एवढ्या महान हस्तीचा उल्लेख भारतातच नव्हे तर जगात इतकी सविस्तर माहिती देणारा हा एकमेव शिलालेख आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी या वेळी दिली.

जतन करण्याची गरज
सध्याच्या परिस्थितीत हे शिलालेख कचऱ्यात धूळखात पडलेले असून, या शिलालेखांचे जतन करण्याची गरज असल्याचे मत इतिहास अभ्यासक उज्ज्वल पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी शहरातील काही जुन्या ठिकाणांना देखील भेट दिली.या वेळी अविनाश चौधरी, आबा महाजन, जितेंद्र महाजनही उपस्थित होते.

इतिहासाची साक्ष
हा शिलालेख पालिकेचा आवारात आणून ठेवणार असून, नागरिकांनाही ते पाहता येतील. हे शिलालेख म्हणजे इतिहासकालीन धरणगावची साक्ष देते, अशा भावना नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT