pankaj patil.jpg 
जळगाव

चाळीसगावच्या "ब्लडमॅन'ची अनोखी समाजसेवा; तीन हजारांहून अधिक रक्‍तदात्यांची तयार केली शृंखला 

आकाश धुमाळ

चाळीसगाव : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकी आटत चालली आहे, असे प्रत्येकाच्याच तोंडून ऐकू येते. बऱ्याचदा अगदी रक्‍ताची नाती देखील संपुष्टात आल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. मात्र, रक्‍तातूनच नाती जोडण्याचा अनोखा वसा येथील एका ध्येयवेड्या तरुणाने घेतला आहे. दोन, चार नव्हे, तर तब्बल तीन हजारांहून अधिक रक्‍तदाते या युवकाने एकत्र जोडले आहेत. समाजातील गरजूंना रक्त देण्यासाठी हे रक्तदान सदैव तयार असतात, ते केवळ या तरुणामुळे. तरुणाच्या या कार्यामुळेच त्याला त्याची "ब्लडमॅन' म्हणून ओळख निर्माण झाली आहे. तालुक्‍यात एकही रुग्ण रक्‍तावाचून आपले प्राण गमावणार नाही', या वाक्‍याला कृतीत उतरवणाऱ्या या "ब्लडमॅन'चे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. 
चितेगाव (ता. चाळीसगाव) येथील पंकज पाटील या तरुणाने थोर पुरुषांचे विचार आत्मसात करून समाजासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेतला. दवाखान्यात रुग्ण उपचारार्थ दाखल झाल्यानंतर बऱ्याचदा रक्‍ताची मागणी होते. बऱ्याच वेळा रुग्णाच्या कुटुंबीयांना रक्‍ताविषयीची माहिती नसल्याने रक्तासाठी त्यांची तारांबळ उडते. यात त्यांचा वेळ आणि पैसाही भरपूर जातो. अनेकदा त्यांची तांराबळ उडत व त्यात वेळही जातो. अशावेळी रक्‍तासाठी कोणाकडे जावे, असा प्रश्‍न उभा राहतो. हा प्रश्‍न गांभीर्याने लक्षात घेऊन पंकज पाटील याने गरजेच्या वेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांशी संपर्क वाढविला. केवळ संपर्क वाढवून तो थांबला नाही तर ज्यांना रक्ताची गरज आहे, अशांना ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आज पंकज पाटील याने तब्बल तीन हजारांहून अधिक रक्‍तदात्यांची शृंखला तयार केली आहे. तालुक्‍यात कोणालाही रक्‍ताची गरज भासल्यास, पंकजशी संपर्क केला जातो. कोणत्या ग्रुपचे रक्त पाहिजे, ही माहिती मिळवल्यानंतर पंकज लगेचच संबंधित रक्तदात्यांशी संपर्क साधतो आणि कमी वेळात गरजूला रक्त तातडीने उपलब्ध करून देतो. आपल्या संपर्कातील सर्व रक्तदात्यांना त्याने "लाइफ सेव्हर' या ग्रुपमध्ये संघटित केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या कार्यात पंकजने आतापर्यंत पाचशेहून अधिक गरजूंना रक्‍ताचा पुरवठा केला आहे. ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. रक्तदानाच्या या कार्यामुळे तालुक्‍यातील अनेक कुटुंबीयांशी त्याचे नाते जडले असल्याचे पंकज सांगतो. या "ब्लडमॅन'ला त्याच्या या सामाजिक कार्यात पिनू सोनवणे, दीपक पाटील, पवन निकुंभ, सनी शिरसाठ, नीलेश गायकवाड, भूषण विसपुते यासारख्या अनेक मित्रांची मोलाची साथ लाभली आहे. 

"थॅलेसिमीया'चे रुग्ण दत्तक 
"थॅलेसिमीया' हा रक्तातील हिमोग्लोबीनमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे होणारा आजार आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला दर महिन्याला नवीन रक्‍त द्यावे लागते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला रक्‍तदाता शोधणे हे संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी अवघड होते. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर रक्‍तदाते मिळणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे आपल्या "लाइफ सेव्हर ग्रुप'च्या माध्यमातून पंकज पाटील याने आठ ते दहा रुग्णांना दत्तक घेतले असून या सर्वांना तो दरमहा रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्ताचा पुरवठा करीत आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी पंकज पाटील जणू देवदूतच ठरला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT