Waghur Dam 
जळगाव

ब्रेकिंगः वाघूर धरणाचे प्रथम सर्व २० दरवाजे उघडले

पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चेतन चौधरी

भुसावळ : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Heavy Rain) वाघूर नदीच्या उगमस्थली झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणात (Waghur Dam) पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी या धरणाचे प्रथम यंदाच्या पावसाळ्यात सर्व २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ४९६१८ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

Waghur River Flood

वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी,२८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे.

धरणात आणखी पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे २० दरवाजे मंगळवारी सकाळी उघडण्यात आले. उघडण्यात आलेल्या या दरवाज्यांमधून सध्या ४९६१८ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT