Wine shop closed  
जळगाव

जळगाव ब्रेकिंगःशासनाचा दीड कोटींचा महसूल बुडाला,वाईन मर्चंटचा संप

अधिकृत अनुज्ञप्ती धारकांना पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे केली आहे.

देविदास वाणी


जळगाव : जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनतर्फे (Jalgaon District Wine Merchant Association) आज शनिवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्याल चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकपर्यंत सुमारे चारशे बिअर शॉपधारक, वाईन शॉपी, देशी मद्य विक्रेत्यांनी (Wine shop closed) सहभाग घेतला. दुपारी एकपर्यंत मद्य विक्रीतून पाच ते साडेपाच कोटींची उलाढाल होते. त्यातून ३८ टक्के महसूल शासनाला (Government revenue Drowned) दिला जातो. बंदमुळे दुपारपर्यंत अपेक्षीत एक ते दीड कोटींचा महसूल शासनाचा बूडाला आहे.

Wine shop closed



जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात अवैधरीत्या धाबे, हॉटेल सुरू आहेत. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना दारू विक्री होत आहे. अशा अवैधरीत्या दारूविक्री करणारे धाबे, हॉटेल चालकाविरुद्ध कारवाही करावी, काही गुंडगिरी करणारे वैधरीत्या दारू विकणाऱ्या वाईनशॉप, बार मालकावर हल्ले करतात. नुकतेच वरणगाव येथे अधिकृत अनुज्ञप्तीधारक ज्ञानदेव झोप यांच्या डोक्यात दारूची बाटली मारून जखमी करण्यात आले. यामुळे अधिकृत अनुज्ञप्ती धारकांना पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनतर्फे काल करण्यात आली होती. या मागणीसाठी लक्ष वेधले जावे म्हणून आज दारू विक्रीची दूकाने न उघडता दुपारी एक पर्यंत संप पुकारण्याचे काल ठरले होते. त्यानूसार आज संप पुकारण्यात आला.


असोसिएशनचे अधक्ष ॲड. रोहन बाहेती, सचिव पंकज जंगले, सुनील भंगाळे, मनिष चौधरी, ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, जामनेरचे शंकर मराठे, चाळीसगावचे उदय पवार, भडगाव-पारोळ्याचे सुरेश मराठे, मनिष बाहेती, ललित पाटील, नितीन पंजाबी आदींनी पदाधिकाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.


जळगाव जिल्हा...
* वाईन शॉप--३८
* देशी दारूची दुकाने--१७५
* बिअर शॉपी--१५०

Pankaj Jungle

ग्रामीण भागात अवैधरित्या ढाबे, हॉटेलवर परवाना नसताना मद्य विक्री होते. अनेक बिअरबार,परमीटरूम धारक, बार चालकांवर हल्ले होतात. याच्या निषेधार्थ व पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी यासाठी आज संप पुकारला होता. तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे.
पंकज जंगले, सचिव, जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT