Villager Election 
जळगाव

चुंचाळे: लोकनियुक्त सरंपचाचे भवितव्य ग्रामस्थांच्या हाती..

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दोन मतदान केंद्रावर प्रत्यक्षात मतदानाला सुरूवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच (Publicly appointed Sarpanch) सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व तो पारित देखील झाला. मात्र, लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र करण्यासंदर्भात ग्रामसभेची देखील मंजुरी आवश्यक असते. यासाठी आज सकाळी अकराला पिठासिन अधिकारी पी. टी. देवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली आहे, व त्यांनंतर आता प्रत्यक्षात ग्रामस्थांकडून (Villager) सरपंचाविरूद्ध आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान सुरू आहे. याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. लोकनियुक्त सरंपचाचे (Motion of no confidence) भवितव्य ग्रामस्यांच्या हाथी असेच म्हणावे लागेल.

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. तेव्हा दि. ७ जुनला चुंचाळे ग्रामपंचायत येथे विशेष सभा बोलविण्यात आली होती. व सरपंच पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते, असा नियम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गावात आज विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदानाला सुरूवात झाली असुन मतदान करण्यासाठी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दोन मतदान केंद्रावर प्रत्यक्षात मतदानाला सुरूवात झाली आहे, या मतदानात एकुण २ हजार ९२ हे मतदार या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.


तेव्हा चुंचाळे गावातील शाळेतील मतदान केन्द्रा बाहेर ग्रामस्थांची मोठी गर्दी ही रांगेत दिसुन येत आहे. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी व पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी. टी. देवराज हे असुन या ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान होत नागरीक ठरवतील सरपंच या पदावर राहतील की नाही. तालुक्यात लोकनियुक्त सरपंच यांच्याविरुद्ध अशाप्रकारे अविश्वास झाल्यानंतर ग्रामसभेतून अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासंदर्भातील जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावरील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी पोलीस निरिक्षक सुधिर पाटील व पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT