Mahavikas Aghadi 
जळगाव

रावेरः नगरपालिका निवडणूकीत मविआ एकत्र लढणार-आमदार शिरीष चौधरी

तीनही पक्षांचे जागावाटप आणि उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत अंतिम निर्णय अजून घेता येणार नाही

दिलीप वैद्य

रावेर : येथील पालिकेची (Municipal Elections) निवडणूक महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने एकत्रितरित्या लढण्यावर स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एकमत झाले असून प्रभाग रचना आणि आरक्षण झाल्यावर जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhary) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्याआधी आमदार श्री चौधरी यांनी शहरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महा विकास आघाडीतील घटक पक्षांच्या पालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रमुख नेत्यांशी याच विद्यालयाच्या कार्यालयात चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीतील वरील तीनही पक्ष असल्याने रावेर पालिकेची निवडणूक देखील या तीनही घटक पक्षांनी आघाडी करून लढवावी असा विचार श्री. चौधरी यांनी मांडला. त्यावर उपस्थित सर्वांनीच अनुमोदन दिले आहे.तीनही पक्षांचे जागावाटप आणि उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत अंतिम निर्णय अजून घेता येणार नाही; अंतिम प्रभाग रचना आणि जागांचे आरक्षण जाहीर झाल्यावरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा अशी सूचना विविध कार्यकर्त्यांनी मांडली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने रावेर पालिकेतही सत्ता मिळाल्यास विकासासाठी आधिक निधी मिळवणे शक्य होईल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रल्हाद महाजन, रमेश महाजन (गोठूशेठ), हरिष गनवाणी,अनिल अग्रवाल, प्रकाश मुजुमदार,सोपान पाटील,आसिफ मोहम्मद, ज्ञानेश्वर महाजन , नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी (खिरवडकर), रविंद्र पवार, डाँ. राजेंद्र पाटील, मेहमूद शेख, प्रणित महाजन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT