जळगाव

अजिंठा घाट रस्त्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार

जळगाव औरंगाबाद महामार्गावरील सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलेले अजिंठा घाटातील रस्ता खूपच नादुरुस्त आहे.

सकाळ वृत्तसेवा


वाकोद (ता. जामनेर) : औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर असताना जगप्रसिद्ध अजिंठा लेणी (Ajanta Caves) येथे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी येथील अजिंठा - जळगाव महामार्गादरम्यान अजिंठा घाटातील रस्त्याची दुरवस्था प्रकर्षाने जाणवली. या लेण्यांना जगभरातून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. त्यासोबतच येथील स्थानिकांसाठी देखील हा रस्ता दुरुस्त होणे आवश्यक आहे, अशी खंत पुणे येथील एका कार्यक्रमात खासदार सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Central Minister Nitin Gadkari) यांच्याकडे व्यक्त केली होती.

याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कात्रज उड्डाणपुलाच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात भेटून चर्चा केली व हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. या वेळी हा रस्ता एकूण १५० किमी लांबीचा चौपदरी असून, यापैकी ११० किमी काम पूर्ण झाले आहे. अशी देखील माहिती मंत्री गडकरी यांनी दिली.

तसेच जळगाव औरंगाबाद महामार्गावरील सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलेले अजिंठा घाटातील रस्ता खूपच नादुरुस्त असून, याबाबत माहिती देताना त्यानी सांगितले, की नुकतीच मार्च महिन्यात वन विभागाची ना हरकत मिळाली असून, डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. या रस्त्याबाबतचे म्हणणे ऐकून त्यावर तातडीने उत्तर दिल्याबद्दल गडकरी यांचे मनापासून आभार. तसेच या रस्त्यावरुन नेहमीच मोठी हस्ती जात असतात परंतु खासदार सुळे यांनी या समस्येकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT