जळगाव

जिद्दीपुढे नियतीही झुकली; आईच्या कष्टाचे मुलाने केले चीज

सचिन महाजन


जामठी (ता. बोदवड) : येवती येथील सागर गायकवाड याची कहाणी ऐकल्यावर आपणही थक्क व्हाल. ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर...’, या ओळींप्रमाणे कुटुंबाचा जीवन जगण्यासाठीचा चाललेला संघर्ष, घरात अठराविश्व दारिद्र्य, पितृछत्र हरवलेले, अशा प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत सागरने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची (Central Industrial Security Force) (सीआयएसएफ) परीक्षा उत्तीर्ण (Passed the exam) होत यशाचे शिखर गाठले. ( jamthi village yong man success achieved in poor conditions)


सागरचे आई, वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यातच सागरचे पितृछत्र हरपले. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी अशिक्षित आईकडे आली. अशिक्षित आईने छपराच्या घरात राहात मुलाला चांगले शिक्षण देऊन काहीतरी बनवायचे स्वप्न बघितले. मुलानेही जिद्दीने कष्ट केले. सागरने शिक्षणासह व्यायाम करण्यावर भर देऊन भारतमातेच्या रक्षणासाठी स्वप्न बघितले. आई स्वतः अशिक्षित असूनही मागे हटली नाही आणि अखेर हाताला यश आले. गरीब शेतकरी कुटुंबातील सागर गायकवाड याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची (सीआयएसएफ) परीक्षा उत्तीर्ण होत यशाचे शिखर गाठले व आईचा विश्‍वास सार्थ ठरविला. सागर सध्या छत्तीसगड येथे प्रशिक्षण घेत आहे.


येवतीसारख्या छोट्या गावात अवघ्या दीड एकर शेतीवर उपजीविका करणारी सागरची आई, लहान भाऊ, बहीण आहे. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीत बेभरवशाचे जगणे गायकवाड कुटुंबीयांच्या वाट्याला आले होते; पण सागरने आईच्या कष्टाचे चीज केले आणि जीवनात सुरू असलेल्या संघर्षावर मात करून सागरने यश मिळवले.

आईला अश्रू अनावर
सागरला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाचा कॉल आल्यावर दिलेल्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी हजर व्हायचे होते. सागर बुधवारी (ता. ३०) ड्यूटीवर जाणार त्या दिवशी येवती गावातील मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट यांनी सागरचे औक्षण केले. त्यावेळेस उपस्थितांसह सागरच्या आईला अश्रू आवरता आले नाहीत.

लहानपणी घर छपराचे होते. तेव्हा आई रात्रभर जागून पावसाच्या पाण्याला वाट करून देत असे. इतका त्रास आईने सोसला आहे. बहिणी व वडिलांचे कष्ट व भाऊने दिलेली साथ, मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी आज यशस्वी झालो आहे. जिद्द व चिकाटीने, आत्मविश्वासाने परिस्थितीशी दोन हात करून संघर्ष केला, तर यश हमखास मिळते.
-सागर गायकवाड, सीआयएसएफ, छत्तीसगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT