leopard leopard
जळगाव

वरखेडेत पुन्हा बिबट्याचे दर्शन..आणि शेतकऱ्यांची उडाली झोप !

चांगला पाऊस झाल्याने शेतीशिवार फुलुन गेला असतांना पुन्हा या भागात बिबट्याचे दर्शन झाले.

दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) परिसरात पुन्हा बिबट्याचे (leopard) शेतकऱ्यांना (Farmers) दर्शन घडले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सात वर्षापूर्वी या भागात नरभक्षक बिबट्याने तब्बल सात मानवी बळी घेतले होते. त्यानंतर त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. त्यानंतरही या भागात बिबट्याचे दर्शन होतच राहिले. मध्यंतरी बिबट्या गायब झाल्याने परिसरातील नागरीकांनी व शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला असताना आता पुन्हा बिबट्याने दर्शन दिल्याने ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. (leopard reappears in varkhed village citizen farmers worried)

मंगळवारी (ता. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास वरखेडे येथील पिनल पवार व विक्रमसिंग कच्छवा हे चारचाकी वाहनातून मेहूणबारेकडून वरखेडेकडे येत असतांना जयसिंग दोधू कच्छवा यांच्या शेताजवळ बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. या प्रकरणाने दोघांनी चांगलीच भंबेरी उडाली. दोन दिवसापूर्वीही वरखेडे येथील झिरो वायरमन श्री. राठोड यांनाही रात्रीच्या वेळेस बिबट्या दिसल्याने घबराट पसरली आहे.

leopard

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतीशिवार फुलुन गेला असतांना पुन्हा या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.सात वर्षापूर्वी याच भागात नरभक्षक बिबट्याने अक्षरशा हैदोस घातला होता. त्या बिबट्याला ठार केल्यानंतरही पुन्हा या भागात बिबट्याचे दर्शन झाले होते व रानडुकारांना मारण्यासाठी या अंथरेलल्या जाळ्यात बिबट्या अडकला होता. त्यानंतरही अधुन-मधून बिबट्याचे दर्शन होत असल्याचे बातम्या येत असतानाच आता दोन दिवसांपासून पुन्हा बिबट्याचे दर्शन या भागात होवू लागल्याने भितीने गाळण उडाली आहे.

leopard

शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत...

वरखेडे परिसर हा गिरणा पट्टयात येतो. बारामाही पाणी असल्याने या भागात बागायत क्षेत्र मोठे असून, उसाची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्यातच या भागात रान डुकरांचा मोठा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. शेती पिकांचे नुकसान करणारी रानडुकरे हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. मात्र, दोन दिवसापासून लोकांना दर्शन देणाऱ्या बिबट्यामुळे या भागातून रानडुकरांचा फडशा पाडला जात असल्याचे वेगळेच चित्रही पहावयास मिळत आहे. त्यामुळे या भागात एकीकडे बिबट्याची धास्ती असली तरी उपद्रवी रानडुकारांचा बिमोड होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरणही आहे. रानडुकरांच्या भक्ष्यामुळे हा बिबट्या माणसाळलेला झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, मागील अनुभव पाहता बिबट्याची दहशत या भागात कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20: भारताने विश्वविक्रमासह सामना जिंकला, अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशीची तुफान फटकेबाजी; ट्वेंटी-२०त अशी मॅच नसेल पाहिली

बाबा वेंगांनी सांगितलं होतं? नोव्हेंबरमध्ये 'या' ५ राशींचं नशीब चमकणार? पैसा, नोकरी अन् प्रेमात मोठे बदल

शेतकऱ्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर! मुरबाडमधील कारवाईप्रकरणी नागरिकांचा संताप; तहसीलदारांकडे निवेदन

नदीतले ताजे मासे अन् गावाकडचा खास बेत! पाहा मासे बनवण्याची पारंपरिक पद्धत; Mandavi Special

IND vs NZ 3rd T20I : ९ चौकार, ११ षटकार.. अभिषेक शर्माच्या ३७ चेंडूंत ११३ धावा; क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना... टीम इंडियाचे वर्ल्ड रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT