जळगाव

पक्ष प्रवेशा वेळी पवार साहेबांकडून मी शब्द घेतला आहे, अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा- खडसे 

दिपक चौधरी

कुऱहा काकोडा ः राज्यात गेल्या काळात भाजपाची सत्ता होती, तर जलसंपदा खाते गिरीश महाजन यांच्याकडे होते. मात्र, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या भागातील कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन, बोदवड उपसा सिंचन ,मुक्ताई उपसा जलसिंचन या योजनांचे काम रखडले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे पक्षाविषयी काय योगदान ? मी आमदार-़खासदार नसलो तरी माझ्यात काम करण्याची धमक आहे. कारण पक्ष प्रवेशाच्या वेळी शरद पवारांकडुन मी शब्द घेतला आहे. अपूर्ण राहिलेल्या योजना पुर्ण करण्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे असे कुऱहा काकोडा येथील प्रवेश सोहळा प्रसंगी खडसे बोलत होते.

आवश्य वाचा- श्रीराम रथोत्सवाची दीडशतकी परंपरा कायम; पण उत्सवाला मर्यादा

पुढे बोलतांना खडसे म्हणाले, की मी स्पर्धेक असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंग सारखा गुन्हा दाखल करण्याचे नीच राजकारण करण्यात आले. ज्या पक्षाला मी लहानाचे मोठे केले तो पक्ष सोडावा वाटत नव्हता. मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे वाटले. मी पक्ष सोडला नाही मला सोडायला भाग पाडले. 

मुलगा गेला तरी मी पक्षासाठी उभा राहिलो ! 

खडसे पुढे म्हणाले की, मला पक्षाने भरपूर दिले, असे सांगितले जाते. मात्र मीही माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे दिली आहेत. मुलगा गेल्यानंतरही पक्षासाठी उभा राहिलो आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. माझी छळणूक सुरुच राहीली.

एका व्यक्तीमूळे संपूर्ण महाराष्ट्राचे वाटोळे झाले
भाषणात बोलतांना खडसे देवेंद्र फडणवीसांवर टिका करतांना म्हणाले, की अन्याय होत असतांना पक्षात कायम असल्याने कार्यकर्ते पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत होते, म्हणून निर्णय घ्यावा लागला. पक्षाने एका व्यक्तीचे लाड केल्याने संपूर्ण महारष्ट्राच वाटोळे झाले आणि मिळणार असलेली सत्ताही गेली. ही व्यक्ती कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT