rationcard  rationcard
जळगाव

नंदूरबार जिल्ह्यातील २८ हजार शिधापत्रिकाधारकांना लाभ

राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ही योजना सुरू करण्यात आली आहे.

धनराज माळी

नंदुरबार : केंद्र शासनाच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत आजअखेर राज्यातील सहा हजार ३२० शिधापत्रिकाधारकांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली आहे, तर इतर राज्यातील तीन हजार ५११ शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांत एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलीटीद्वारे २८ हजार २२९ शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केली आहे.

२०१८ मध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरवात झाली. योजनेंतर्गत संबंधित रास्त भाव दुकानात आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलीटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.

कार्डधारक बायोमेट्रीक

ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यात क्लस्टरच्या स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जानेवारी २०२० पासून १२ राज्यात, तर डिसेंबर २०२० पासून ३२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातील राष्ट्र्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कार्डधारक बायोमेट्रीक आधार प्रमाणीत करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो.

सद्यस्थितीत शिधापत्रिकेवरील १२ अंकी क्रमांक

राज्यातील रास्त भाव दुकानातून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी समाजबांधव, स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतराच्या ठिकाणी कोणत्याही रेशन दुकानात त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करून घेण्याची सुविधा पोर्टेबिलीटीद्वारे ई- पॉस मशिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी लाभार्थ्यांना सद्यस्थितीत शिधापत्रिकेवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करून आधार प्रमाणीकरणद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

सर्वसाधारपणे राज्यात दरमहा सात लक्ष शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलीटीचा वापर करून धान्याची उचल केली जाते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९४.५६ लक्ष शिधापित्रकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलीटीचा लाभ घेतला आहे. योजनेच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक १४४४५ कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT