Pair of oxen 
जळगाव

पत्नीचे दागिने विकून घेतली बैलजोडी; पण या घटनेने शेतकऱ्यापुढे अंधःकार

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा (जळगाव) : लोहारी (ता. पाचोरा) येथील शेतकऱ्याने शेतीकामासाठी आवश्यक असलेली बैलजोडी घेतली. याकरीता पत्नीचे सोन्याचे दागिने विकले आणि उन्हाळ्यातच नवी बैलजोडी घेतली. पण एक हंगाम देखील घेतला नाही तोच बैलजोडीवर विजेची तार पडल्‍याने दोन्ही बैल मृत झाल्याची घटना घडली.

लोहारी येथील गोविंद पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याने यावर्षी चांगले उत्पन्न घेता यावे; तसेच घराला हातभार म्‍हणून दुसऱ्याच्या शेतात जावून मजुरी मिळविता येईल. म्हणून बैल जोडी विकत घेण्याचा निर्धार केला. पण बैलजोडी घेण्यासाठी हाती पैसा नव्हता. बैलजोडी घेणे गरजेचे असल्याने त्यांनी पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकले व बैलजोडी घेतली. परंतु अवघ्या दीड महिन्यातच शेतात जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावरील तार बैलजोडीच्या अंगावर पडल्याने दोन्ही बैल मृत झाले .तर बैलगाडीवर असलेला त्यांचा मुलगा विजेच्या शॉकने फेकला जाऊन जखमी झाला. 

शेतीच्या कामांचा प्रश्‍न
सदर घटनेमुळे गोविंद पाटील यांच्यासमोर अंधःकार पसरला असून तहसीलदार कैलास चावडे यांनी घटनेचा पंचनामा केला. बैलजोडीचे शवविच्छेदन ही करण्यात आले असून वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडल्याचे गोविंद पाटील यांनी सांगितले. आता बैलजोडी अभावी पुढील शेतीची कामे कशी करावी? हा प्रश्न समोर असल्याने शासनाने नुकसान भरपाई देवुन न्याय द्यावा आर्त विनवणी गोविंद पाटील यांनी केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT