pachora krushi bajar samiti
pachora krushi bajar samiti 
जळगाव

बनावट कागदपत्र तयार करून हमालीचा ठेका 

चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जळगाव) : हमाली कामाचे बनावट कागदपत्र तयार करत शासनाची दिशाभूल करून ठेका घेतल्याप्रकरणी कुऱ्हाड (ता. पाचोरा) येथील दक्ष हमाल मापाडी सहकारी संस्थेविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. असे असले तरी चौकशी व कारवाई गुलदस्त्यात असल्याने या प्रकरणात महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव व राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा सूर उमटत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याप्रकरणी चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी तक्रारदार मानसिंग राजपूत व अरुण पाटील यांनी केली आहे. 
कुऱ्हाड येथील दक्ष हमाल मापाडी सहकारी संस्थेचे चेअरमन जगदिश तेली यांनी सदरची संस्था जुनी आहे तसेच भडगाव, चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील इतर स्पर्धक संस्थांनी ठेक्या संदर्भात संस्थेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे, असे भासवले. यासंदर्भातील बनावट कागदपत्र तयार करून शासकीय धान्य गोदामातील रेशनिंग मालाच्या गोण्या गोदामात टाकणे व ग्रामीण भागात वितरणासाठी गाड्यांमध्ये भरणे यासाठीचा ठेका घेतला. 

नोंदणीकृत संस्‍थेलाच ठेका पण
एक वर्ष अनुभव असलेल्या नोंदणीकृत संस्थेलाच अशा प्रकारचा ठेका दिला जातो. परंतु दक्ष हमाल मापाडी संस्था काही महिन्यांपूर्वी नोंदणीकृत झालेली असताना सदरची संस्था एक वर्षापासूनची आहे असा कृषी उत्पन्न बाजार समितीचा व चार्टड अकाऊंट यांचा बनावट दाखला सादर करून सदरचा ठेका या संस्थेने मिळवला. 

पदाधिकारी हमाली संस्‍थेचे संचालक
दक्ष संस्थेत हमालीचा व्यवसाय करणारे जे संचालक दाखवले गेले ते वास्तवात हमालीचा व्यवसाय न करता स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, धान्य दुकानदार व इतर नोकऱ्या करणारे आहेत. याचीही सखोल चौकशी झाल्यास यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून याप्रकरणी संत जनार्दन हमाल मापाडी संस्थेचे चेअरमन मानसिंग राजपूत यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात जगदीश तेली यांच्याविरोधात फसवणूक, हेराफेरी प्रकरणी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला असला तरी सखोल चौकशी व कार्यवाही होत नसल्याने त्यांनी आता वरिष्ठांकडे न्याय मागण्याची भूमिका घेतली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT