home robbery 
जळगाव

पाचोरा येथे घरफोडी, ६८ हजारांचा ऐवज लंपास 

चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जळगाव) : येथील बळिरामनगर भागात शनिवारी (ता. ५) रात्री चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व ६८ हजार ५०० रुपयांची रोकड असा ऐवज लांबवला. घरमालकाच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 


पाचोरा येथे बळीरामनगरात राहणारे नरेंद्र गायकवाड हे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते बळिराम नगरात वास्तव्यास असून, कामानिमित्त शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. शनिवारी रात्री ते घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. 

सोन्याचे दागिने आणि रोकड
घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याची ३० हजारांची चैन, १५ हजारांची अंगठी, १३ हजार ५०० रुपयांचे कानातील टोंगल व दहा हजारांची रोकड, असा ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. त्यांच्या घरातील प्रत्येक रूममधील सामान अस्ताव्यस्त फेकले असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केला. नरेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. हवालदार अजय मालचे पुढील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरंध घाटात दरडी कोसळल्या, २७ गाड्यांमध्ये ७० ते ८० प्रवासी रात्रभर अडकले; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, १० दरडी हटवल्या

बाबा गेल्यानंतर आई अचानक एकटी पडली... प्रार्थना बेहरेने सांगितला वडील गेल्यानंतरचा भावुक प्रवास

Latest Marathi News Live Update : आळंदी आणि देहूमध्ये न जाता पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

Panvel: पनवेलमध्ये दुर्दैवी घटना! गाडेश्वर धरण परिसरात ओढ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Flood: पवना नदीला पूर! जांबे गावात घरांना पाण्याचा वेढा; एनडीआरएफकडून २५ नागरिकांची सुखरूप सुटका

SCROLL FOR NEXT