Lightning struck the sky 
जळगाव

कडाड्‌कन आवाज आला अन्‌ गावकऱ्यांचा ठोकाच चुकला; विजेचे थरारनाट्य 

शैलेंद्र बिरारी

नगरदेवळा (ता. पाचोरा, जळगाव) : पावसाळा सुरू असला, की विजेचा कडकडाट अन्‌ ढगांचा गडगडाट सारेच अनुभवतात. गुरुवारी (१७ सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास आकाशात विजांचा लखलखाट अन् ढगांचा गडगडाट सुरू असतांना पाऊस सुरू झाला. रात्री साडेदहाच्या सुमारास गावातील वीजप्रवाह बंद झालेला असताना आकाशात विजेचे तांडव नृत्य सुरू होते... असा अनुभव ग्रामस्थांनी अनुभवला. 
दिवसभर गरमीही होत होती, तर डासांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना झोप लागणार तरी कशी? त्यामुळे बहुतेक जण जागीच तर ‘अग्नावती’ला मोठा पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अग्नावती चौपाटीवरील दुकानदार, व्यापारी दुकानातील वस्तू भरून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची लगबग सुरू होती. रात्रीच्या सुमारास अतिशय भेदक मारा व्हावा नि बॅट्समनचा त्रिफळा उडावा, अशी सर्वांच्या जिवाची लाही लाही करणारी वीज कडाडली, ती आली नि गावाबाहेर निघूनही गेली. मात्र, त्यावेळी थरारक अनुभव ग्रामस्थांनी अनुभवला. वीजप्रवाह बंद असताना ज्यांचे बल्बचे बटन सुरू होते, ते बल्बही क्षणभर चमकले. यावरून तिच्या रौद्र रूपाची कल्पना येईल. वीज कुठेतरी कोसळळी असावी, अशी चर्चा गावात सकाळी सुरू होती. 

अन्‌ मंदिराचा भाग ढासळला
शेतकरी शेतात गेले तेव्हा खालच्या गावातील चुंचाळे रस्त्यालगत ऐतिहासिक श्रीमंत पवार घराण्याच्या छत्री बागेतील महादेव मंदिराजवळून ‘ती’ गेल्याने मंदिरासमोरील भाग ढासळला. ही बातमी गावात कळली नि बघ्यांची गर्दी झाली. सायंकाळी शेतकरी, मजूर घरी येताना ती आली असती, तर काही जीवितहानी झाली असती. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, ही ग्रामस्थांच्या दृष्टीने हितावह बाबच म्हणावी लागेल. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT