जळगाव

पाचोऱ्याला ऑक्सिजन प्लांट तयार होणार; आमदारांनी केली जागेची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे कोरोना रुग्णांची व भविष्यातील दुरोगामी आरोग्य उपाययोजना म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, आगामी १५ दिवसांत हे प्रकल्प (प्लांट) कार्यान्वित होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकल्प उभारणीसाठी अधिकाऱ्यांसमवेत आमदार पाटील यांनी पाचोरा येथील गोराडखेडा रोडलगत नियोजित ट्रामा केअर सेंटर व पाचोरा रुग्णालयाशेजारील जागेची पाहणी केली आहे.

या नियोजित प्रकल्पात दिवसाला पाचोरा तालुक्यात ७८ व भडगाव प्रकल्पात ७८ सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून, पाचोरा तालुक्यासाठीचा हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालयाशेजारील जागेवर करण्याचे निश्चित करण्यात आले तर भडगाव तालुक्यासाठी हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालयालगत उभारण्यात येणार आहे.

पाचोरा व भडगावला रस्ते वाहतूक मार्गे जळगाव वा इतर ठिकाणाहून ऑक्सिजन पोहचतो. यात अनेकदा अडचणी येतात म्हणून मतदार संघातील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोऱ्यासाठी ५० लाख व भडगावसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. पाचोरा शहरात भडगावसह शेजारील जामनेर, सोयगाव, शेंदुर्णी, पहूर, तिडके आदी भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे आरोग्य सेवेवर अधिक ताण पडत असतो.

जागेच्या पाहणीप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, अबुलेस शेख, किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, भरत खंडेलवाल यांची उपस्थिती होती.

‘रेमडेसिव्हिर’ची खरेदी करणार

पाचोरा ग्रामीण रुग्णालयासाठी ४०० रेमडेसिव्हिर, भडगाव ग्रामीण रुग्णालयासाठी २५० इंजेक्शन व पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यकी ५० इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT