Parola Police 
जळगाव

पारोळ्यात गुटखा पकडला;तपासणी करतांना पोलिसांची कारवाई

Jalgaon Crime News: गुटखा बंदी केलेली असताना देखील अवैधरित्या गुटखा वाहतूक करताना मिळाल्याने अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय पाटील

पारोळा ः येथील धरणगाव रस्त्यालगत असलेल्या पिंपरखेड मारुती मंदिराजवळ रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी (Parola Police Station) वाहन तपासणी करीत असताना धरणगाव येथील सतीश रमेश पाटील यांची टेम्पोची तपासणीत तीन लाख 66 हजार रुपये किमतीचा गुटखा (Gutkha) व दीड लाख रुपये किमतीचा टेम्पो मिळून आल्याने आरोपीस गुटक्यासह ताब्यात घेतल्याची घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, सपोनि निलेश गायकवाड, हवलदार बापू पारधी, सत्यवान पवार ,महेश पाटील, अशांनी पारोळा धरणगाव रस्त्यावरील पिंपरखेड मारुती मंदिराजवळ सरकारी पोलीस गाडी साईडला लावून गाड्यांची तपासणी करीत असताना धरणगाव कडून येणारा महिंद्रा टेम्पो क्रमांक एम एच 19- बी. एम. 4957 वरील चालक सतीश रमेश पाटील (वय 38) रा. राममंदिर समोर धरणगाव याची तपासणी केली असता गाडीत विमल गुटखा, तंबाखू सुगंधी गुटखा असे एकूण आठ गोणपाट व आठ गोणी भरलेले असे एकूण तीन लाख 66 हजार ऐंशी रुपयाचा गुटखा तर एक लाख पन्नास हजाराचे टेम्पो असा रात्री जप्त करण्यात आला आहे. पारोळ्यात ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई आहे.

सदर गुटखा हा माल गाडी भाडे हजार रुपये देऊन भटू मराठे धरणगाव यांनी पारोळा येथील कैलास चौधरी यांच्याकडे पोहच करण्यास सांगितले असल्याचे टेम्पो चालक सतीश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत पोलीस नाईक प्रवीण रमेश पारधी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून सतीश रमेश पाटील या विरुद्ध शासनाने गुटखा बंदी केलेली असताना देखील अवैधरित्या गुटखा वाहतूक करताना मिळाल्याने अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT