जळगाव

रावेर तालुक्यात होणार सात वाळू घाटांचे लिलाव 

दिलीप वैद्य

रावेर : तालुक्यातील ७ वाळू घाटांचे लिलाव जिल्हा प्रशासनाकडून लवकरच होत असून, त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीस आळा बसेल आणि शासनाच्या महसुली उत्पन्नातही भर पडेल, अशी माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली. 

आवश्य वाचा- सभा, मेळाव्यांसाठी केवळ आता पन्नास जणांची मर्यादा -

श्रीमती देवगुणे यांनी बुधवारी (ता. २) पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की शासनाच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने शेती वर्ग बदल करणे, विनापरवाना नावात बदल केलेल्या मालमत्ता नियमित करणे, तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या जमिनी नियमानुकूल करून घेणे आणि कूळ कायद्यानुसार शेतीतील नावे नियमानुकूल करून घेणे याबाबतच्या नोटिसा प्रशासनाने बजावल्या आहेत. 
प्रशासनाने बजावलेल्या नोटिसांनुसार मुदतीच्या आत नागरिकांनी तहसीलदार कार्यालयात फेरबदल करून घ्यावेत. मुदतीच्या आत नागरिकांनी संपर्क साधल्यास नाममात्र शुल्क भरून बदल करता येऊ शकतील.

मुदत संपल्यानंतर मात्र आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा श्रीमती देवगुणे यांनी दिला. तालुक्‍यातील अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध महसूल विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली असून, ३२ वाहनांकडून १७ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. जळगाव जिल्ह्यातील २७ वाळू घाटांचा लिलाव लवकरच होणार आहे. महाराष्ट्र पर्यावरण विभागाकडून फक्त जळगाव जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची परवानगी मिळाली असून, येत्या पंधरा दिवसांतच याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल आणि चोरट्या वाळू वाहतुकीला आळा बसू शकेल, असेही त्यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT