accident 
जळगाव

शिरवेलवरून परतणाऱ्या जळगावच्या भाविकांच्या गाडीचा अपघात

Jalgaon Accident News: दर्शन करून परततांना पाल दूरक्षेत्र पोलीस ठाणे अंतर्गत वनविभागाच्या नाक्या पासून अर्धा किलो मिटर अंतराववरील वळणावर अपघात झाला.

प्रदिप वैद्य

रावेर ः श्रावण सोमवार निमित्त मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) शिरवेल (Shirwel) येथील महादेवाचे दर्शन करून परतणाऱ्या जळगावच्या कांचन नगरातील भाविकांच्या मालवाहू मेटॅडोर गाडी पाल (ता . रावेर) येथे झाडाला धडक दिल्यानंतर पलटी होऊन अपघातात (Accident) झाला. या घटनेत दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सर्व भाविक जळगाव येथील होते.

याबाबतचे वृत्त असे की जळगाव येथील कांचन नगरातील भाविक मालवाहू गाडी (क्रमांक एम. एच. १९ सी. वाय. ५३१५) याद्वारे मध्यप्रदेशातील शिरवेल येथे महादेवाच्या दर्शनार्थ गेले होते. दर्शन करून परततांना पाल दूरक्षेत्र पोलीस ठाणे अंतर्गत वनविभागाच्या नाक्या पासून अर्धा किलो मिटर अंतराववरील वळणावर सोमवार (ता.२३) रोजी रात्री साडेअकराचे सुमारास चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्या लगत झाडाला जोरदार धडकली.

accident

दोन युवकांचा मृत्यू..

या घटनेत मेटॅडोर पलटी होऊन झालेल्या अपघातात गोलू बंडू परदेसी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६) दोघे राहणार (कांचननगर जळगाव) हे दोघे जागीच ठार झाले . तर अजय सुनिल वाल्हे (वय २१), गणेश रविंद्र सोनवणे (वय २३), परेश निंबा सोनवणे (वय २६), चेतन रविंद्र मोरे (वय २३), पवन रविंद्र मोरे (वय २२), महेश गोविंदा सोनवणे ( वय २१), गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) हे जखमी झाले.

पोलिसांची घटनास्थळी धाव...

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड पोलीस संदीप धनगर नरेंद्र बाविस्कर श्री ठाकूर यांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला . जखमींना रात्रीच जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे. याबाबत भुषण दिलीप सपकाळे राहणार कांचननगर जळगाव यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरून चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनीस शेख करीत आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT