जळगाव

मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी जे.के.पाटील

नेवासा येथे २०१३ मध्ये झालेल्या मुख्याध्यापक महामंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले होते.

दिलीप वैद्य

रावेर ः जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.आतापर्यंतच्या इतिहासात जिल्ह्याला हा मान दुसऱ्यांदा मिळाला आहे.

आज (ता १) सायंकाळी महामंडळाच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये ही निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड (सांगली) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.श्री पाटील रावेर तालुक्यातील विकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. जळगाव जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ९ वर्षे संपादक,९ वर्षांपासून अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ८ वर्षांपासून उपाध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषविली आहेत. नेवासा येथे २०१३ मध्ये झालेल्या मुख्याध्यापक महामंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले होते. ही निवड २ वर्षांसाठी आहे. यापूर्वी उचंदा (ता मुक्ताईनगर) चे यू डी पाटील यांना २००४ मध्ये हा मान मिळाला होता.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT