Death 
जळगाव

विहिरीवर वीज पडून महिलेचा मृत्यू, तीन बालके थोडक्यात बचावले

शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती देखील सुदैवाने बचावला आहे.

दिलीप वैद्य

रावेर : तालुक्यातील विवरा खुर्द येथे शेतात विहिरीवर वीज पडून (Lightning Strikes) शेतमजूर महिला जागीच ठार (Death) झाल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. सुदैवाने शेजारीच असलेली भाची आणि २ मुले यांना कोणतीही इजा झाली नाही. या

बाबतची अधिक माहिती अशी की, विवरे खुर्द येथील माजी सरपंच कविता राजेंद्र पाटील यांच्या शेतात वाघेला हे आदिवासी शेतमजूर कुटुंब झोपडीतच रहात होते. दुपारी चारला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नूरकी वाघेला (वय ३५ वर्ष) ही महिला शेजारच्याच विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून ती जागीच ठार झाली.

शेजारीच असलेल्या झोपडीत तिची भाची रोशनी ( वय ९ वर्षे), मुलगा राहुल (वय ७ वर्षे) आणि मुलगी रवीना ( वय ३ वर्ष) यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. याच शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती देखील सुदैवाने बचावला आहे. वीज पडलेला महिलेला तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला; निफ्टी 25,000च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Kolhapur Gold Silver : कोल्हापुरात सोन्या चांदीच्या दर वाढले की कमी झाले, सहा महिन्यांत दर किती वाढले?

Pune Weather Update : पुणे आणि पिंपरीत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

'कसं काय पाटील बरं हाय का?' जान्हवीच्या आईचं गाणं ऐकलं का? ऑन स्क्रीन आईचं तेजश्री प्रधाननं सुद्धा केलं कौतुक

Rinku Singh: अंडरवर्ल्डकडून रिंकू सिंगला धमकी, मागितली 'इतक्या' कोटींची खंडणी; दाऊद गँगचा हात... वेस्ट इंडिज कनेक्शन

SCROLL FOR NEXT