MP Raksha Khadse 
जळगाव

पीकविम्याबाबत लवकरच कार्यवाही; केंद्रीय मंत्र्यांचे आश्‍वासन

केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी याबाबत केंद्र सरकार कार्यवाही करून शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन दिले.

सकाळ डिजिटल टीम

खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत म्हणाल्या, की पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारला पत्र देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.

सावदा : प्रधानमंत्री पीकविमा योजना (Prime Crop Insurance Scheme) नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लागू केली आहे. पण, या योजनेच्या लाभापासून महाराष्ट्रातील शेतकरी वंचित आहेत. जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळालेला नाही. याबाबत आपण लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांनी लोकसभेत केली. त्यावर उत्तर देताना केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी याबाबत केंद्र सरकार कार्यवाही करून शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन दिले.


याबाबत प्रश्‍न विचारताना खासदार खडसे म्हणाल्या, की पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारला पत्र देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला, तर ते केंद्राकडे बोट दाखवतात. केंद्राकडून आम्हाला पैसे मिळालेले नसल्याने देऊ शकत नाही. विशेषतः आमच्या जळगाव, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. कधीपर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार याची माहिती द्यावी. त्यावर श्री. चौधरी म्हणाले, या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र सरकार सतत काम करीत आहे. पण, राज्य सरकारचा २०२०-२१ चा हिस्सा २०३ कोटी रुपये ज्यावेळी केंद्र सरकारकडे येतील, त्यावेळी लागलीच केंद्र विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देईल.

महाराष्ट्रात जे काही नुकसान झालेले आहे त्याचे मोजमाप राज्य सरकार व विमा कंपनीमार्फत सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच नुकसानभरपाई दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर खासदार खडसे म्हणाल्या, ज्यावेळी पीकविमा काढला जातो त्यावेळी बँकेकडून विमा कंपनीला डेटा दिला जातो. पण, त्यात अनेक चुका असतात. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावर आपण काय कारवाई करू शकतो? या प्रश्‍नावर श्री. चौधरी यांनी, अशा परिस्थितीत विमा क्लेमची जबाबदारी ही त्या बँकेचीच आहे. तरीही काही चुका असतील तर दुरुस्तीसाठी सरकार दोन ते पाच दिवस मुदत वाढवून देत असते. तरीही डेटा उशिरा मिळणे किंवा क्लेम देण्यास उशीर झाल्यास १२ टक्के व्याज देण्याची जबाबदारी ही बँक, विमा कंपनी आणि राज्य सरकार यांची आहे. नवीन विमा योजनेत शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT