tarsod fagne highway
tarsod fagne highway 
जळगाव

तरसोद - चिखली महामार्गाचे चौपदरीकरण ७० टक्के 

देविदास वाणी

जळगाव : तरसोद ते चिखलीदरम्यान महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामांनी ‘कोरोनो संसर्गा’च्या अनलॉकनंतर चांगला वेग घेतला आहे. हे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज आहे. भुसावळ, फेकरी, वरणगावजवळील रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामासाठी काही दिवसांसाठी दर दिवशी चार तासांचा रेल्वेचा ब्लॉक मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गातील तरसोद ते चिखलीदरम्यान चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात येत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी आहे. मात्र, नंतर मुंबई-पुणे महामार्गावर ज्या वेगाने वाहने (धूम स्टाइल) जातात तशी वाहने या मार्गावरूनही नेता येतील. सध्या तरसोद ते नशिराबाद (जुना टोलनाका), डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय ते साकेगावदरम्यानच्या महामार्गावर धूम वेगाने वाहने चालविली जात आहेत. 

चिखली (ता. मुक्ताईनगर) ते तरसोददरम्यान ८८.७ किलोमीटर लांब अंतराचे काम पूर्ण झाले आहे. भुसावळ तालुक्यातील ५३ किलोमीटरचे महामार्ग चौपदरीकरणाचे पूर्ण झाले आहे. नाहाटा चौफुलीवर व्हेईकल अंडरपास (व्हीयूपी) मंजूर आहे. त्याचेही काम जोरात सुरू आहेत. वरणगावला साडेतीन किलोमीटरचा वळण रस्ता काढण्यात आला आहे. त्याचेही काम जोरात सुरू आहे. सोबतच फुलगावजवळील दीपनगर केंद्राच्या रेल्वे केंद्राजवळ उड्डाणपूल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नशिराबादला बोदवड फाट्याजवळ, भुसावळजवळील केंद्रीय विद्यालयाजवळ, नाहाटा चौफुली, खडका चौफुलीजवळ व्हेईकल अंडरपासचे कामे सुरू आहे. 

रेल्वेला पत्र... 
भुसावळ रेल्वे पूल, फेकरी टोलनाक्याजवळ, वरणगाव येथे रेल्वेच्या मार्गावरून प्राधिकरणाला उड्डाणपूल तयार करायचे आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दर दिवशी चार तासांचा रेल्वेचा ब्लॉक घेण्याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) यांना भेटून पत्रही दिले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT