khadki river  
जळगाव

अन्‌ नदीने अचानक प्रवाह बदलला

सतीश बिऱ्हाडे

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर (ता. जामनेर) येथील खडकी नदीवर बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या बंधाऱ्याच्या बाजूचा भराव वाहून गेल्याने नदीचे पाणी थेट शेतात शिरले. यामुळे शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीने आता पात्र सोडून शेतातून वळण घेतले आहे. 

तोंडापूर परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्प यावर्षी शंभर टक्के भरल्याने खडकी नदीला सुरवातीपासून मोठे पूर येत आहेत. तोंडापूर, फत्तेपूर व गावाच्या मध्ये कमी उंचीचा पूल असल्याने दळणवळण वारंवार बंद होत आहे. याच खडकी नदीवर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोल्हापुरी सिमेंट बांध बांधण्यात आले असून, सततच्या पावसामुळे व नदीला आलेल्या पुरामुळे तोंडापूर व माडवे गावामध्ये भैरोबा मंदिराजवळ सिमेंट बंधाऱ्याच्या बाजूचा भराव वाहून गेला. त्यामुळे नदीच्या पाण्याने पात्र सोडून माडवे येथील शेतकऱ्यांच्या शेतातून वळण घेतल्याने अर्धा एकरापेक्षा जास्त शेत वाहून गेले आहे. सध्या त्याच शेतातून नदी वाहत आहे. 

कपाशी अन्‌ शेतरस्‍ता गेले वाहून
नदीच्या पाण्याने थेट शेतातून वळण घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील कपाशी पीक वाहून गेले आहे, तर माडवे गावाजवळील दुसऱ्या बांधाच्या शेजारील भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा शेतरस्ताही वाहून गेल्यामुळे ५० शेतकऱ्यांना हंगामातील शेतमाल आणण्यासाठी समस्या उद्‍भवणार आहे. नदीवरील बंधाऱ्याचे करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचेच ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निकृष्ट कामामुळेच बंधाऱ्याच्या बाजूचा भराव वाहून जात असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT