जळगाव

प्रशिक्षणाच्या नावाखाली आदिवासी युवतींची फसवणूक

राजू कवडीवाले

यावल  : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शिलाई मशिन, शिवणकाम प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली आदिवासी युवक, युवतींसह प्रकल्प कार्यालयाची सुमारे १४ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ४ मार्च २०१४ ते २८ सप्टेंबर २०१७ या कालावधीत औरंगाबाद येथील क्रांतिज्योती प्रमिला चव्हाण महिला मंडळास अटी-शर्तीच्या अधीन राहून ११८ आदिवासी युवक व युवतींसाठी शिवणकाम व शिवणकामाच्या तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी नऊ हजार ७०० प्रतिविद्यार्थ्याप्रमाणे ११ लाख ४४ हजार ६०० रुपये देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या मंडळाने आदिवासी युवक, युवतींना कोणतेही प्रशिक्षण न देता व शिलाई मशिन वितरित न करता व कुठलेही प्रमाणपत्र न देता, एक दिवस शाळेची निवड करून एका हॉलमध्ये लाभार्थ्यांना बसवून त्यांचे छायाचित्र काढून प्राशिक्षण दिले व शिलाई मशिन वितरित केल्याचे दाखवून गोरगरीब आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक केली.

या संदर्भात आदिवासी एकात्मिक विकास कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भुजंगराव झंपलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत क्रांतिज्योत प्रमिलाजी महिला मंडळाच्या सचिव चंद्रकला शिवाजी जाधव (रा. लोहारा, पो. मंगरूळ, ता. मानवत, जि. परभणी) व शिवाजी रमेश जाधव (दक्षिण विहार अपार्टमेंट, कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध शासकीय निधीचा गैरव्यवहार करून शासन व आदिवासींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस कर्मचारी संजय तायडे तपास करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: अखेर बिहारमध्ये रणशिंग फुंकलं! निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Jasprit Bumrah: '...तर कदाचित बुमराह कधी गोलंदाजी करू शकला नसता', मोहम्मद सिराजने उलगडलं बुमराहच्या 'वर्कलोड'चं कोडं

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

SCROLL FOR NEXT