MLA Girish Mahajan  
जळगाव

दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना दमडीही दिली नाही-गिरीश महाजन

माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी भाषणास सुरवात करतानाच माजी आमदार, माजी खासदार हरीभाऊ जावळे यांची उणीव भासत असल्याची जाणीव करून दिली.

सकाळ वृत्तसेवा



यावल : तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही. शेतकऱ्यांचे (Farmers) अतोनात नुकसान होऊनही, पंचनामे नाहीत, मंत्र्यांचे (Minister) दौरे होऊनही दोन वर्षांत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दमडीचीही मदत दिली नाही, असा आरोप माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी केला.


भाजपच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. येथील धनश्री चित्र मंदिरात हा मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, संघटनमंत्री रवी अनासपुरे उपस्थित होते. प्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सुरेश धनके, पद्माकर महाजन, मसाका अध्यक्ष शरद महाजन, नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील, जि. प. सदस्य तथा आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जि. प. सदस्य सविता भालेराव, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पं. स. गटनेता दीपक पाटील, लक्ष्मी मोरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, प्रदेश सदस्य मीना तडवी, नरेंद्र नारखेडे, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.


यावेळी जिल्हा किसान मोर्चातर्फे निवृत्त सैनिक, व प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, नितीन राणे, डॉ. नरेंद्र कोल्हे, भरत महाजन, हेमराज फेगडे, उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, अतुल भालेराव, उज्जैन सिंग राजपूत, व्यंकटेश बारी,फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे, देविदास पाटील, किशोर कुलकर्णी, सागर कोळी, विद्या पाटील, सरला कवडीवाले, अनंत नेहेते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी तर आभार बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांनी मानले.

जिल्हा बॅंकेसाठी भाजपकडून चाचपणी

माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी भाषणास सुरवात करतानाच माजी आमदार, माजी खासदार हरीभाऊ जावळे यांची उणीव भासत असल्याची जाणीव करून दिली. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल स्थापन करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना, माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी अजून एकच बैठक झाली असून भाजपतर्फे चाचपणी सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. (कै.) हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्या अनुपस्थितीविषयी पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांना विचारणा केली असता, श्री. जावळे मुंबईत असल्याने मेळाव्यास उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अमोल जावळे यांचे नाव मेळावा पत्रिकेवर खूपच खाली असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा मेळावास्थळी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT